Incident of security guard Baliram Kesarkar; The next disaster was averted in CPR 
कोल्हापूर

सुरक्षारक्षक बळिराम केसरकर यांचे प्रसंगावधान ;  सीपीआरमध्ये पुढील अनर्थ टळला 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  : सीपीआरच्या ट्रॉमा केअर सेंटरला आग लागली असताना मेन स्विच ऑफ करण्याचे प्रसंगावधान सुरक्षारक्षक बळिराम केसरकर यांनी दाखवले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आणि देवदूतासारखे धावलेल्या केसरकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. 
पहाटे सर्वजण गाढ झोपेत असताना सेंटरला आग लागली. झोपेतून उठलेल्या केसरकर यांची नजर सेंटरकडे गेल्यावर आग लागल्याचे त्यांना दिसले. त्यांनी तत्काळ ओरडतच मेन स्विचकडे धाव घेतली आणि स्विच ऑफ केला. त्यांच्या ओरडण्याने अन्य कर्मचारीही खडबडले. महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, डॉक्‍टर्स, नर्सेस यांनी तत्काळ रुग्णांना सेंटरमधून हलविण्यास सुरवात केली. सहा ते सात रुग्णांना त्यांनी दुसऱ्या विभागात नेले. श्री. केसरकर मुंबईतील बॅंक ऑफ बडोदामध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. साळगांव (ता. आजरा) हे त्यांचे मूळ गांव. त्यांच्या वडिलांवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत म्हणून ते दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात आले होते. त्यांच्यासोबत त्यांची आईही होती. साडेतीनच्या सुमारास त्यांना जाग आल्यानंतर आईला झोपण्यासाठी जागा करून ते बसूनच राहिले. त्याच दरम्यान त्यांना ट्रामा केअर सेंटरच्या खिडकीतून आगीचे लोट बाहेर येताना दिसले. 
सुरक्षारक्षक म्हणून काम करत असल्याच्या अनुभावावरून त्यांना परिस्थितीचे गांभिर्य लक्षात आले. त्यांनी आग लागल्याचे ओरडून सांगण्यास सुरूवात केली. त्याचवेळी आग लागलेल्या सेंटरमधील वीज पुरवठा खंडीत करण्यासाठी ते धावतच मेन स्विचकडे केले, प्रसंगावधान राखत त्यांनी हा मेनस्विच बंद केला त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मेन स्विच बंद करेपर्यंत अनेक रूग्ण आतच अडकून होते. तोपर्यंत महापालिकेच्या अग्नीशमक दलाचे बंब दाखल झाले. अग्नीशमक दलाचे कर्मचारी, नर्स आणि वॉर्डबाय यांनी अन्य रूग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढले.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT