The incident took place on the backdrop of World Mother's Day
The incident took place on the backdrop of World Mother's Day 
कोल्हापूर

मुक्या भावनांना फुटला कंठ ; कुत्र्यांच्या तावडीत सापडलेल्या पिलाची अखेर आईशी झाली भेट....

राजू पाटील

राशिवडे बुद्रुक (कोल्हापूर) : 'जीवो जीवस्य जीवनम्' हा  सृष्टीचा नियम आहे. अभयारण्य परिसरात तर हे नित्याचेच. एक जीव दुसऱ्यावर अवलंबून असतो. मात्र माणसाने एखाद्या अडचणीत आलेल्या किंवा संकटात सापडलेल्या प्राण्याचा जीव वाचवला की त्याला भूतदया म्हणावं. अशीच भूतदया काल एका वनपाल व गावकऱ्यांच्या हातून घडली. भेकराच्या एका नवजात चिमुकल्या पिलाला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवून आईच्या कुशीत दिले. जागतीक मातृदिनाच्या पाश्र्वभूमीवर ही घटना नोंद घ्यावी अशीच ठरली.

  काल शनिवार ( ता. ९) सकाळी सातच्या सुमाराची घटना. राधानगरी धरणाच्या मुख्य भिंतीच्या फाटकाजवळ पहाटेच्या सुमारास एक भेकर पिल्लासह पाणी पिण्यासाठी आले, पाणी प्याले व परत जात असताना त्यांच्या वासाने आलेल्या गावठी कुत्र्यांना बघून पळू लागले. आई जंगलात लपली पण भेदरले पिलू तिथेच धडपडू लागले. आई झुडपात आणि पिलू रस्त्यावर अशी घालमेल सुरू होती. पिलाच्या पाठीमागे कुत्री लागली. त्यामुळे भेदरलेले पिल्ले डांबरी रस्त्याने पळत होते. याचवेळी इथून जाणाऱ्या इब्राहिम वाडीतील गौस तांबोळी व तौसिफ तांबोळी यांना हा प्रकार दिसून आला. त्यांनी तात्काळ कुत्र्यांच्या तावडीतुन भेकराच्या पिल्लाला सोडविले व वन्यजीव विभाग राधानगरी यांना घटनेची माहिती दिली.

 वनपाल अंबाजी बिराडे व वन कर्मचारी घटनास्थळी तात्काळ हजर झाले. त्यांनी भेकराचे पिलास ताब्यात घेतले. घटनास्थळी फिरून पाहणी केली असता राधानगरी धरणाच्या जलाशया मध्ये पहाटेच्या वेळेस पिल्लासह भेकर पाणी पिण्यासाठी आलेल्या पायांचे ठसे मिळून आले. तांबोळी बंधूंच्यामुळे आज एका मुक्या प्राण्याला जीवदान मिळाले. भकराचे पिल्लू एकदोन आठवडे वयाचे असावे त्याला कोणतीही इजा झालेली नाही. प्रसंगावधान राखल्याने त्याला जिवन मिळाले.

 दिवसभर ते गोंडस पिलू बिराडे यांनी सांभाळले. त्यांना रात्री नऊच्या सुमारास पिल्लाला शोधण्यासाठी आई भेकर जंगल परिसरात ओरडत असल्याचे जाणवले. त्यानी पिल्लास त्याच्या आईजवळ मुळ अधिवासात सोडले. एका मुक्या मातेला तिचं काळीज मिळालं. मुक्या भावनांना कंठ फुटला. एकीकडे जगभर मातृदिनाची तयारी सुरू असताना त्याच रात्री निर्भीड जंगलात आईला लेकरू मिळालं.

जंगलात एकजीव दुसऱ्या जिवावर जगतो. वाघ, बिबटे' रानकुत्र्यांचे तृणभक्षी प्राणी शिकार होतातच. आम्हाला याची जाणीव आहे, पण आज एका नवजात पिलाला आईजवळ सोडताना एक विलक्षण समाधान लाभले.

अंबाजी बिऱ्हाडे (वनपाल राधानगरी) :

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Result: लोकसभेचा आज महानिकाल! NDA हॅट्रिक साधणार की INDIA सत्तेत येणार याची उत्कंठा शिगेला

Manoj Jarange: उपोषणाला आता अंतरवलीच्या नागरिकांचाच विरोध! जरांगे म्हणतात, आता मन...

SL vs RSA T20 WC 2024 : आफ्रिकेला 77 धावा करताना फुटला घाम; श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलं टेन्शन

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी अन् कुठं पाहणार, जाणून घ्या एका क्लिकवर

Share Market: लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजार? तेजी येईल की घसरण होईल?

SCROLL FOR NEXT