कोल्हापूर

इचलकरंजीत व्हीलचेअरअभावी दिव्यांग ताटकळत

ऋषिकेश राऊत

इचलकरंजी : व्हीलचेअर उपलब्ध नसल्याने एका दिव्यांग मुलीला ताटकळत बसण्याचा प्रसंग सोमवारी नगरपालिकेत पाहायला मिळाला. दिव्यांगांसाठी नगरपालिकेत असणारी व्हीलचेअरच नाहीशी झाल्याने महिला व बालकल्याण विभागाची पळापळ सुरू झाली. संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांनी धारेवर धरल्याने दिव्यांग मुलीजवळ येऊन अधिकाऱ्यांनी कामाची पूर्तता केली. 

नगरपालिकेत दिव्यागांच्या सोयीसाठी स्वतंत्र प्रवेश मार्ग व व्हीलचेअर शासनाने बंधनकारक केली आहे. मात्र इचलकरंजी नगरपालिकेत व्हीलचेअरचा अभाव दिसून आला. नगरपालिकेने तरतुदीनुसार दिव्यांगांसाठी पाच टक्के अनुदान देण्याचे घोषित केले. यासाठी दिव्यांगांना ऑनलाइन नोंदणी करून खातरजमासाठी प्रत्यक्ष नगरपालिकेत यावे लागत आहे. खातरजमासाठी दिव्यांगांना पालिकेतील महिला व बालकल्याण विभागात जाऊन अनुदानासाठी पात्रता द्यावी लागते.

सोमवारी एक महिला आपल्या दिव्यांग मुलीसह पालिकेत आली मात्र, व्हीलचेअर अभावी दिव्यांग मुलीला पालिका प्रवेशद्वाराजवळच ताटकळत बसावे लागले. हे नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर याविषयी पालिका प्रशासनाला विचारणा केली. या ठिकाणी काहीकाळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. याबाबत महिला व बालकल्याण विभागातील अधिकाऱ्यांना माहिती समजताच ते प्रवेशद्वाराजवळ आले आणि त्याच ठिकाणी त्यांनी दिव्यांग मुलीचा अर्ज भरून कामाची पूर्तता केली. 

नगरपालिकेतील दिव्यांगांसाठी असणारा स्वतंत्र ट्रॅक वारंवार बंद असल्याने दिव्यांग बांधवांनी संताप व्यक्त केला. व्हीलचेअर उपलब्ध होत नसल्याने नगरपालिका कर्मचाऱ्यांना वारंवार विनवण्या कराव्या लागतात. याचा प्रत्यय सोमवारी पुन्हा नगरपालिकेत आला. 

व्हीलचेअर शोधासाठी तारांबळ 
व्हीलचेअर शोधासाठी कर्मचारी इतरत्र धावले. पालिकेच्या सभागृहाजवळ असलेली व्हीलचेअर अखेर प्रवेशद्वाराजवळ आणून ठेवली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी धूळखात पडलेली चेअर स्वच्छ करून दिव्यांगांच्या सेवेत ठेवली. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDU19 vs SAU19 : 6,6,6,6,6,6,6,6..! वैभव सूर्यवंशीचे आणखी एक वादळी शतक, आरोन जॉर्जसोबत आफ्रिकन गोलंदाजांची धुलाई

Kidney Racket : एक कोटीत दडपला पीडिताचा मृत्यू! किडनी तस्करीत धक्कादायक खुलासा, गोपनीय अंत्यसंस्कार, दोन पीडित दगावले

Latest Marathi News Live Update : इम्तियाज जलिल यांच्या गाडीवर हल्ला

Faf du Plessis ने इतिहास रचला! पाकिस्तानी शोएब मलिकचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला, बनला जगातील पहिला फलंदाज ज्याने...

मीरा भाईंदरचे राजकीय समीकरण तिकीट वाटपात अडकले; निवडणूक का आणि कशी गुंतागुंतीची झाली? जाणून घ्या संपूर्ण आढावा...

SCROLL FOR NEXT