increase rate of tobacco and alcohol in islampur 
कोल्हापूर

तंबाखूची पुडी तीस रुपयाला अन् कॉर्टर ५०० रुपयाला तरी पण तलफ भागेना... 

शांताराम पाटील

इस्लामपूर - कोरोनाचे संशयित इस्लामपूर शहरात सापडल्या पासून दारू, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्या तलफदारांची मोठी पंचाईत झाली आहे. लोकांना होणारी तलफ व त्यामुळे होणारी तडफड याचा फायदा घेत तंबाखू, दारू व गुटका याची चोरटी विक्री तिप्पट दराने सुरू आहे. दहा रुपयाला मिळणारी तंबाखूची पुडी आता तीस रुपयाला मिळू लागली आहे तर शंभर ते दीडशे रुपयांना मिळणारी दारूची कॉर्टर 400 ते 500 च्या घरात गेली आहे. हे दर तिप्पट होऊनही तलफदार यांची कोणतीही तक्रार नसून ते हे सर्व सामान खरेदी करण्यासाठी छुप्या मार्गाने चढाओढ करताना दिसत आहेत.

 पेट्रोल, डिझेल व जीवनावश्यक वस्तूंच्या दरात चार दोन रुपयांची झालेली भाववाढ सर्वत्र गदारोळ करते. गृहिणींचे बजेट कोलमडले, सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असा गाजावाजा सुरू होतो. मात्र तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ, दारू यांच्या किमतीत बेकायदेशीर मार्गाने तिप्पट वाढ होऊनही एकही तलफदार या विरोधात ब्र शब्द न काढता, काहीही करून ती वस्तू मिळवण्यासाठी चढाओढ करत आहे. लॉक डाऊनच्या काळात गल्ली बोळात जाऊन ही वस्तू ज्या ठिकाणी मिळत आहे त्या लोकांना गाठत  कसलीही तक्रार न करता हे पदार्थ विनवण्या करत आपल्या पदरात पाडून तलफ भागवताना दिसत आहेत.  ही सर्व धडपड पाहिल्यानंतर हे व्यसन जीवनावश्यक वस्तू पेक्षाही मोठे असल्याचे दिसत आहे. लॉक डाऊनचा फायदा घेत अनेक साठेबहाद्दरांनी आपल्याकडील माल छुप्या पद्धतीने तिप्पट दर लावून विकण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

Dattatraya Meghe Passes Away: लोकसेवेचा वटवृक्ष निमाला! माजी खासदार, लोकनेते दत्ता मेघे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, विविध क्षेत्रात हाेता दबदबा..

Pune Accident: पुण्यातील मुथाळणे घाटात शेतमजूरांची पिकअप पलटली; एक गंभीर तर १८ किरकोळ जखमी!

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT