India Aghadi warns Raju Shetti  esakal
कोल्हापूर

'आम्ही राजू शेट्टींच्या मागे पळणार नाही, त्यांना गरज वाटली तर ते आमच्याकडे येतील'; 'इंडिया आघाडी'चा स्पष्ट इशारा

आम्ही राजू शेट्टी यांच्या मागे पळणार नाही. त्यांना गरज वाटली तर ते आमच्याकडे येतील.

सकाळ डिजिटल टीम

हातकणंगले लोकसभेची जागा शिवसेनेकडे असली तरी इंडिया आघाडीकडून जो उमेदवार देण्यात येईल, त्याच्या पाठीशी एकत्रितपणे राहण्याची ग्वाही यावेळी सर्वांनी दिली.

इचलकरंजी : माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी येथील कार्यक्रमात स्वतंत्र लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आम्ही राजू शेट्टी यांच्या मागे पळणार नाही. त्यांना गरज वाटली तर ते आमच्याकडे येतील. त्यांच्या मागे नाईलाज म्हणून आम्ही जाणार नाही. त्यामुळे हातकणंगले (Hatkanangle Constituency) लोकसभा मतदार संघात इंडिया आघाडीतील घटक पक्षाचा हक्काचा उमदेवार द्यावा, अशी मागणी मेळाव्यात केली.

इचलकरंजी विधानसभा क्षेत्रासाठी इंडिया आघाडीचा (INDIA Aghadi) पहिला मेळावा येथे काँग्रेस भवनमध्ये घेतला. यावेळी आघाडीतील प्रमुख पक्षांचे पदाधिकारी उपस्‍थित होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे मदन कारंडे, माजी आमदार राजीव आवळे, माजी नगरसेवक सागर चाळके, संजय कांबळे, राहुल खंजिरे, नितीन जांभळे, महादेव गौड, आदींची भाषणे झाली.

हातकणंगले लोकसभेची जागा शिवसेनेकडे असली तरी इंडिया आघाडीकडून जो उमेदवार देण्यात येईल, त्याच्या पाठीशी एकत्रितपणे राहण्याची ग्वाही यावेळी सर्वांनी दिली. केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणांवरही जोरदार टीका केली. भावनिक प्रचाराला बळी न पडता मूलभूत विकासाच्या प्रश्नावर ही निवडणूक होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

फेब्रुवारीत घोरपडे नाट्यगृहात व्यापक मेळावा घेण्याची घोषणा केली. यावेळी संजय चौगुले, वैभव उगळे, सयाजी चव्हाण, माकपचे दत्ता माने, शेकापचे शिवाजी साळुंखे, भाकपचे हणमंत लोहार, माजी नगरसेवक प्रकाश मोरबाळे, उदयसिंह पाटील, अमरजित जाधव उपस्‍थित होते. प्रमोद खुडे यांनी सूत्रसंचालन केले. तल सदा मलाबादे यांनी आभार मानले.

खासदार, आमदारांवर टीका

खासदार धैर्यशील माने व आमदार प्रकाश आवाडे यांनी साडेचार वर्षांत कोणत्याही मूलभूत प्रश्नांना हात घातलेला नाही. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये त्यांना मतदार घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास बावचकर यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT