The Indian Football Season Begins Next Month Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

भारतीय फुटबॉल हंगामाचा नारळ फुटणार पुढील महिन्यात

दीपक कुपन्नावर

गडहिंग्लज : कोरोनामुळे ठप्प झालेला भारतीय फुटबॉल हंगामाचा नारळ पुढील महिन्यात फुटणार आहे. अखिल भारतीय फुटबाल महासंघाने व्दितीय श्रेणी इंडियन फुटबाल लिग (आय लिग) स्पर्धा जाहीर केली आहे. कोलकत्यात आठ आक्‍टोंबरपासुन साखळी पध्दीतीने तीन मैदानावर ही स्पर्धा होईल. या स्पर्धेतील विजेता प्रथम श्रेणी आय लिगसाठी पात्र ठरेल. स्पर्धेत अहमदाबादचा अरा एफसी, कोलकत्याचा मोहामोडन स्पोर्टिंग व भवानीपूर एफसी, बंगलुरचा एफसी युनायटेड, दिल्लीचा गहरवाल एफसी सहभागी होणार आहेत. 

मार्च महिन्यात कोरोनाचा संर्सग वाढू नये यासाठी लॉकडाउन सुरू झाले. परिणामी, व्दितीय श्रेणी आय लिग स्पर्धेची अव्वल फेरी सुरू होऊ शकली नाही. प्रथम श्रेणी आय लिगचे उर्वरित सामने रद्द करून सर्वाधिक गुण असणाऱ्या कोलकत्याच्या मोहन बागान संघाला विजेता घोषित करण्यात आले. इंडियन सुपर लिगचा अंतिम सामनाही गोव्यात बंद दरवाज्याआड झाला.

यंदा कोरोनामुळे दरवर्षी जून महिन्यात सुरू होणारी फुटबालपटूंची नोंदणीही दोन महिना उशिरा गेल्या महिन्यात ऑगस्टला सुरू झाली. केंद्रशासनासह देशातील सर्वच राज्यांनी अनलॉक करत नियम व अटी पाळत व्यवहार सुरळीत करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळेच हंगाम कधी सुरू होणार याचीच चिंता फुटबॉल क्षेत्राला लागून राहिली होती. 

गोव्यात नोव्हेंबर महिन्यात बंद दरवाज्याआड आयएसएलचा सातवा हंगाम सुरू होणार आहे. एआयएफएफने अर्धवट असणारी व्दितीय श्रेणी पुर्ण करण्यासाठी अव्वल फेरीचा 8 ते 18 आक्‍टोंबर हा स्पर्धा कार्यक्रम घोषित केला. गतहंगामात झालेल्या पात्रता स्पर्धेतून पाच संघ पात्र ठरले. एटिके संघाने मोहन बागान संघाचे सर्वाधिक शेअर्स खरेदी केल्याने आयएसएलमध्ये हे दोन्हीं संघ मिळुन एकत्र खेळतील.

ईस्ट बंगालच्या आयएसएल सहभागासाठी बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची शिष्ठाई कामी आली. श्री सिंमेट हा भक्कम पुरस्कर्ता मिळाल्याने या संघाने आयएसएलसाठी निविदा भरून औपचारिकता पुर्ण केली आहे. त्यामुळे आयलिग प्रथम श्रेणीत सध्या कोलकत्याचे दोन्ही दिग्गज संघ नाहीत. साहजिकच व्दितीय श्रेणीतून पारंपारिक कोलकत्याचा की, नवा संघ आय लिगसाठी पात्र ठरणार याचीच उत्सुकता लागुन राहिली आहे. 

स्थानिक फुटबाल क्षेत्राला बळ 
कोरोनाचे क्रीडाक्षेत्रही मोठा फटका बसला. एआयएफएफ नव्या हंगामासाठी पुढे सरसावल्याने देशातील राज्य आणि जिल्हास्तरावर देखील फुटबाल हंगामाला गती मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या किमान नोंदणी प्रक्रिया सुरू होऊन संर्सग कमी झाल्यावर नजीकच्या कालावधीत स्पर्धांना सुरवात होण्याची शक्‍यता आहे. 

संपादन - सचिन चराटी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: सिन्नरमध्ये भाजपला धक्का, माणिकराव कोकाटे समर्थक विजयाच्या दिशेने

Nagar Parishad Election Result : शिरोळमध्ये विद्यमान आमदारांना तगडा झटका, यड्रावकर–माने गटाची सत्ता संपुष्टात, मुरगूड–कागल–गडहिंग्लजमध्ये आघाड्यांचे वर्चस्व

Manchar Nagar Panchayat Election Result 2025: मंचर नगराध्यक्षपदाची अटीतटीची लढत; दुसऱ्या फेरीअखेर शिवसेना आघाडीवर

Kolhapur Local Body Election : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील निकाल स्पष्ट; मुरगूडमध्ये मुश्रीफ गटाला धक्का, हातकणंगलेत काँग्रेसचा वरचष्मा

Ex Agniveer BSF Recruitment : मोदी सरकारचा मोठा निर्णय! माजी अग्निवीरांना 'बीएसएफ कॉन्स्टेबल' भरतीत ५० टक्के कोटा निश्चित

SCROLL FOR NEXT