information of kolhapuri bandhara 
कोल्हापूर

जाणून घ्या! महापुरासह अतिवृष्टीच्या लाटा झेलणाऱ्या कोल्हापूर बंधाऱ्यांविषयी...

धनाजी सुर्वे

कोल्हापूर -  शेती सिंचनासाठी कोल्हापूरची ओळख संपूर्ण देशभर करून देणारे ‘कोल्हापूर पद्धतीचे बंधारे गेल्या शंभर वर्षापासून देशभर प्रत्येक जिल्ह्यात भक्कम उभा आहेत. कोल्हापूर पद्धतीचा बंधारा म्हटले की त्याची भक्कमता पटकण लक्षात येते. परंतु, हे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे म्हणजे काय? याविषयी जाणून घेऊया. 

ओढा, नाला इ. लहान जलप्रवाहांवर आणखी पाणी अडविण्यासाठी कमी खर्चात बंधारा बांधणे शक्य अससते. अशा बंधाऱ्यांना कोल्हापूर बंधारा असे म्हणतात. दगडी किंवा काँक्रिटीकरण करून हे बंधारे बांधले जातात. याच कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यांनी शेती सिंचनासाठी कोल्हापूरची ओळख संपूर्ण देशभर करून दिली आहे. 

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कशी सुचली संकल्पना?
सिंचनासाठी बारमाही पाणी मिळावे, यासाठी शेतकरी दरवर्षी नदीला बांध घालायचे; पण पावसाळ्यात हे बांध वाहून जायचे, यातून लोकराजा राजर्षी शाहूंच्या कल्पनेतून कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍याचा विचार पुढे आला. त्यानुसार छत्रपती राजाराम महाराजांनी 1928 साली पंचगंगेवर पहिला बंधारा बांधला. हा बंधारा छोटे धरण म्हणूनच ओळखले जाऊ लागले. काही वर्षांतच कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍याची (केटीवेअर) ओळख देशभर झाली.


कोल्हापुरी पद्धतीचा पहिला बंधारा 
देशातील कोल्हापूर पद्धतीचा पहिला बंधारा पंचगंगा नदीवर (कोल्हापूर)कसबा बावडा येथे 1928 मध्ये छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधला. त्याचे राजाराम बंधारा असे नामकरण केले आहे. हा बंधारा बांधून शंभर वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे; पण मजबूत बांधकामामुळे हा बंधारा अजून अनेक पूर, अतिवृष्टीच्या लाटा झेलत खंबीरपणे नदीत उभा आहे. 

पावसाळा सुरू होण्यापूर्वी या बंधाऱ्याचे बरगे काढले जातात. नदीला पूर आल्यानंतर पुराच्या पाण्याचा दबाव बंधाऱ्यावर येऊन धोका पोहचू नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात येते. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात अचानक जोराचा पाऊस झाला आणि नदीलाही पूर आला. त्यावेळी बंधाऱ्याचे बरगे काढण्याची संधीच मिळाली नाही. सुमारे आठ दिवस बरगे असलेल्या अवस्थेतच बंधारा पाण्याखाली होता. त्यातून बंधाऱ्यालाच धोका निर्माण होण्याची शक्‍यता होती. अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणून मेच्या शेवटच्या आठवड्यातच या बंधाऱ्याचे बरगे काढले जातात. 

नाव कसे पडले ?
नदी, नाला पात्रामध्ये हंगामातील शेवटचा पाऊस, तसेच दीर्घकाळ टिकणारा प्रवाह बंधार्‍यात लाकडी फळ्या अथवा लोखंडी गेट टाकून अडवला जातो, त्या बंधार्‍यास के.टी. बंधारा म्हटले जाते. सदर बांधकामाचा प्रयोग सुरुवातीला कोल्हापूर जिल्ह्यात यशस्वी झाल्याने यास कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असे नामकरण झाले.

कोल्हापुरात असे किती बंधारे आहेत ?

जिल्ह्यात सुमारे 352 बंधारे आहेत. यापैकी काही बंधार्‍यांचे बांधकाम सुरू आहे. सुमारे 293 बंधार्‍यांद्वारे जिल्ह्यात पाणी अडवले जात आहे. 

​उद्दिष्ट्ये
१) जलसंधारण व त्याद्वारे पिकांना थेट संरक्षित पाण्याची सोय करणे.
२) परिसरातील जलस्रोतांचे पुनर्भरण करून, भूगर्भजल पातळी वाढण्यास मदत करणे.

​​जागा निवड
१) नाल्याची खोली कमीत कमी १.५ मी. पर्यंत असावी.
२) नाल्याच्या तालाचा उतार ३ टक्के पर्यंत असावा.
३) नाल्याचे दोन्ही काठ मजबूत असावेत व पायासाठी कमी खोलीवर कठीण स्तर असावा.
४) बंधार्‍याच्या आसपास विहिरींची संख्या जस्त असावी.

​​संरचना
बंधार्‍याचा पाया कठीण स्तरापर्यंत व दोन्ही काठात गुताव्यासाठी खोदकाम करून घ्यावे, बांधकामासाठी साहित्य चांगल्या दर्जाचे असावे, दरवाजे बसविण्यासाठी बांधकामात सोय असावी, बांधकामावर २१ दिवसांपर्यंत पाणी मारावे, दगडी बांधकामात सिमेंट व वाळूचे प्रमाण १:५ असावे. पाण्याची गळती होऊ नये, म्हणून दरवाज्यामध्ये रबरी सील टाकावे. पावसाळ्याच्या अखेरीस बंधार्‍याचे दरवाजे बंद करावेत व पावसाळ्यापूर्वी काढावेत, दरवाजे गंजू नयेत यासाठी त्यांना गंधक लावावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT