Inspired story work of Kanchan Goture of Borgaon kolhapur marathi news 
कोल्हापूर

Video : थक्क करणारा प्रवास; मुलाचा हात गेल्याचं पाहून माऊली खचली नाही; उलट जिद्दीने कांचन बनल्या 'गुळव्या'

बी.डी.चेचर

कोल्हापूर :  उसाचा रस काहिलीत टाकला की तिचं काम सुरू होतं. रसातील मळी काढण्यापासून ते चूलवाणाच्या जाळाकडे क्षणांक्षणाला नजर, उकळणाऱ्या रसाचा रंग जस-जसा बदलतो, तसतसे तिचे लक्ष उकळणाऱ्या रसाकडे खिळून रहाते, तोंडावर येणाऱ्या वाफेच्या झळांचे चटके सोसत रसातला ‘गूळ’ शोधण्यासाठी तिची सर्व शक्ती एकवटते. हाताने फावड्याची हालचाल करत काहिलीत रसाची उधळण करण्याचे काम अव्याहत सुरू होते. रस उतू येऊ नये म्हणून जाळाचे प्रमाण सांगितले जाते. गूळ तयार झाला की, क्षणाचाही वेळ न दवडता रस गूळ करण्यासाठी वाफ्यात ओतला जातो. नऊ वर्षापासून हुपरीपासून आठ किलोमीटरवर असलेल्या बोरगाव (ता. चिक्कोडी) येथील सिद्धेश्‍वर गुऱ्हाळात फक्त तिसरी पर्यन्त शिक्षण घेतलेल्या कांचन धनपाल गोटूरे या महिला गुळव्याची ही कहाणी. 

वीस वर्षापासून गुऱ्हाळघरावर घरातील तीन जणांसह त्या वेग-वेगळे काम साभांळत गुळव्याचा गोडवा शिकत आता नऊ वर्षापासून त्या गुळव्या म्हणून गुऱ्हाळाची जबाबदारी सांभाळत आहेत. गुऱ्हाळ घरांचा ‘गुळव्या’ हा आत्मा असतो. गुळाचा गोडवा, आकार, मऊपणा वाढविण्यासाठी ‘गुळव्या‘ची नजर खूप महत्वाची ठरते. रसापासून गुळ तयार करण्याची प्रक्रीया खुप अवघड असते. रस काहिलीत ओतल्यापासून त्यातील मळी काढणे, तो योग्य तपमानात उकळवणे, गुळाचे रवे करण्यास योग्य स्थिती निर्माण करणे हे अक्षरश: कौशल्याचे काम असते. यात चूक झाली की गुळाचा दर्जा बिघडलाच म्हणून समजा. इतका काटेकोरपणा आवश्‍यक असतो. गुऱ्हाळात महिलांकडून हे काम करणे तसे दुर्मिळच. बोरगाव येथील या गुऱ्हाळात सौ. कांचनताई हे काम आनंदाने व उत्साहाने करत आहेत.

मुलाची संकटावर मात...
कांचन यांच्या मुलाचा हात इंजिनच्या बेल्टला लागला. त्यात त्याला हात गमवावा लागला.परंतु मुलाचा हात गेला म्हणून कांचन यांनी गुळव्याचं काम सोडलं नाही. उलट मुलांन खंबीर होवून एका हातावर कंटेनरचं ड्रायव्हिंगला सुरुवात केली. आज कांजन आणि मुलगा तितक्‍याच उत्साहाने आपले काम पार पाडत आहेत.

संपादन- अर्चना बनगे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT