Inspiring Story of Lata Kumar Chavan esakal
कोल्हापूर

गिरणीत हात गमावला, पतीचं निधन झालं, पण इच्छाशक्ती नाही ढळली..; गिरगावच्या लता चव्हाणांची प्रेरणादायी कहाणी

An inspiring story of Lata Chavan from Girgaon; अपघातानंतर त्या थांबल्या नाहीत तर दोन-तीन महिन्यांत पुन्हा नव्याने गिरणीत काम सुरू केले...

नंदिनी नरेवाडी

पदरात दोन छोटी मुले घेऊन लता कोलमडल्या. मात्र, या दु:खावर मात करत त्यांनी नव्याने सुरुवात करायची म्हणून कंबर कसली.

कोल्हापूर : गिरगावच्या लता कुमार चव्हाण (Lata Kumar Chavan) गिरण चालवतात. मात्र, सतत हसतमुख असलेल्या लता यांच्या जीवनातील संघर्ष वेगळाच आहे. अकाली आलेले वैधव्य, दोन लहान मुलांची जबाबदारी, माहेर गिरगावातील (Girgaon) व्यक्तींच्या पाठिंब्याने गिरण सुरू केली आणि पहिल्याच वर्षी गिरणीत हात अडकला आणि उजवा हात कोपरापासून काढावा लागला.

अपघातानंतर त्या थांबल्या नाहीत तर दोन-तीन महिन्यांत पुन्हा नव्याने गिरणीत काम सुरू केले. त्याच जोरावर आज दोन मुलांचे शिक्षण, लग्न अशा जबाबदारींतून मुक्त झाल्या तरी गिरणीचा व्यवसाय नेटाने सुरू ठेवला आहे. लता चव्हाण यांचे सासर टाकळी. संसारवेलीवर एक चिरंजीव व एक कन्या अशी दोन फुले उमलली. मात्र, सर्व काही आनंदात चालू असताना अचानक पती कुमार यांचे निधन झाले.

पदरात दोन छोटी मुले घेऊन लता कोलमडल्या. मात्र, या दु:खावर मात करत त्यांनी नव्याने सुरुवात करायची म्हणून कंबर कसली. पाच-सहा वर्षे त्या सासरी राहिल्या. मात्र, मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून माहेरी परतल्या. माहेरी आई-वडील, भाऊ यांनी पाठिंबा दिला. त्याच जोरावर त्यांनी गावातच गिरणीचा व्यवसाय सुरू केला. संसाराची गाडी रुळावर येते असे वाटत असतानाच एक दिवस तेलाच्या गिरणीत सोन्याची बांगडी असलेला उजवा हात अडकला.

बांगडी निसटली नाही आणि थेट मनगटापर्यंतचा हातच गिरणीत तुटला. कोल्हापुरात एका खासगी दवाखान्यात शस्त्रक्रिया करावी लागली. कोपरापासून हात काढावा लागला. या अपघातानंतरही त्यांनी हार मानली नाही. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करावे लागेल, या ऊर्मीतून त्यांनी पुन्हा गिरण व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीला उजव्या हाताप्रमाणे डावा हात तितका चालत नव्हता.

जिद्दीने त्यांनी डाव्या हाताने सुद्धा कसब कमावले आणि दैनंदिन कामासह गिरणीतील आवश्यक कामही त्या लीलया करू लागल्या. आज २३ वर्षे पूर्ण झाली तरीही त्यांचा हा व्यवसाय यशस्वी सुरू आहे. दोन्ही मुलांनी चांगले शिक्षण घेतले. दोघांचेही लग्न करून दिले आणि नातवंडांमध्ये त्या रमल्या असल्या तरी गिरणीतील त्यांचे लक्ष कमी झालेले नाही. कितीही संकटे आली तरी त्यांचा सामना जिद्दीने करायचा, असा वस्तुपाठच त्यांच्या आयुष्यातून त्या घालून देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या खेळाडूने रिषभ पंतला दाखवलं 'आमिष'; आपल्या पठ्ठ्याने काय उत्तर दिले पाहा, Viral Video

SCROLL FOR NEXT