installed statue of shivaji maharaj in kolhapur bambavade village 
कोल्हापूर

कोल्हापूरच्या बांबवडे गावात मध्यरात्री उभारला छत्रपती शिवरायांचा पुतळा 

अमर पाटील

बांबवडे ( कोल्हापूर) - बांबवडे (ता. शाहुवाडी) येथे बाजारपेठेच्या प्रमुख ठिकाणी रात्री अचानक शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. माजी आमदार सत्यजित पाटील यांनी हा पुतळा हडवला जाणार नाही असे सांगितले.
 

यावेळी ते म्हणाले, प्रशासनाची बाजू कायद्याच्या चौकटीत असली तरी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुरक्षित आहे. शेजारी पोलिस चौकी असून ग्रामपंचायत व आम्ही सर्वपक्षीय प्रतिनिधी पुढील परवानगीच्या दृष्टीने हीच जागा योग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आम्ही कोणत्याही परिस्थिती हटवू देणार यासाठी आम्हाला तुरुंगात घातले तरी चालेल अशी भूमिका माजी आमदार सत्यजित पाटील यांनी मांडली.
  

बांबवडे पोलिस चौकीच्या अगदी पन्नास फुटांवर अज्ञात शिवप्रेमिंनी एेका रात्रीत पुतळा उभारल्याने याची सर्वात्र चर्चा आहे. यावेळी पोलिस उपाधिक्षक प्रशांत अमृतकर यांनी पुतळ्याची रितसर परवानगी घेऊन प्रतिष्ठापना करावी, असे  जमावास आवाहन केले. 

यावेळी उपविभागीय अधिकारी अमित माळी, तहसीलदार गुरु बिराजदार, पोलिस निरीक्षक अनिल चौगुले,  ए.डी. फडतरे, सहा. पोलिस निरीक्षक भालचंद्र देशमुख, माजी आमदार सत्यजित पाटील, जि.प.  सदस्य व सभापती हंबीरराव पाटील, विजय बोरगे,  उपसभापती विजय खोत, दिलीप पाटील, शिवसेना जिल्हाउप्रमुख नामदेव गिरी , सचिन मुडशिंगकर व कार्यकर्ते उपस्थित होते.


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Talaq-e-Hasan Case: मुस्लिमांमध्ये तलाक-ए-हसन म्हणजे काय? ऐकून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशही संतापले, नेमकं प्रकरण काय?

Pune News : पुण्यात मनमानी खोदाईला ब्रेक! नियम मोडणाऱ्या ठेकेदाराचे काम मनपाने थांबवले; आधी रस्ते दुरुस्त करा, मगच पुढचे काम

Shubman Gill: अनफिट शुभमनला खेळवणार का? गुवाहाटी कसोटीसाठी भारतीय संघासमोर निवडीचा पेचप्रसंग

Latest Marathi News Update LIVE : : नागपूर जिल्ह्यातील कॅाग्रेसचा अंतर्गत संघर्ष टोकाला

Leopard Attack:'पती-पत्नीवर बिबट्याचा प्राणघातक हल्ला'; कोपरगाव तालुक्यातील दाेघे गंभीर जखमी, अंगावर काटा आणणारा थरार !

SCROLL FOR NEXT