an institutional quarantine separating itself from the family 
कोल्हापूर

'तो' रात्रीतच मुंबईहून गावाकडे आला अन् घरी न जाता त्याने थेट गाठलं...

विजय लोहार

नेर्ले (सांगली) - तो मुंबईहून गावाकडे आला, गावात प्रवेश न करता तो थेट स्वतःहुन प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाला आणि १४ दिवस गाव,कुटुंबापासून स्वतःला वेगळे ठेवत संस्थात्मक कॉरंन्टाईन करून घेतलं.कायद्याने पोलिसांनी त्याच्यावर जिल्हा बंदीचा गुन्हा ही दाखल केला. मात्र त्याच्या चेहऱ्यावर आपण गावाकडे आल्याचे समाधान आहे. गावाच्या काळजीने त्याने कोणालाही जवळ येऊन दिले नाही.

नेर्ले ता.वाळवा येथील महेश पाटील हा मुंबई येथे नोकरी निमित्ताने राहतो. मुंबईतील परिस्थिती त्याने डोळ्या देखत अनुभवली. चाकरमाने,वेठबिगारी,कामगार,चालक,हातगाडीवाले यांचे हाल जवळून बघितले आहे. दै.सकाळशी बोलताना त्याने सांगितले की, महामारीच्या काळात मी मुंबईहुन २८ तारखेला घरी न जाता थेट प्राथमिक आरोग्य केंद्र गाठलं आणि स्वतःला प्रशासनाच्या हवाली केलं.महेश म्हणतो की,माझ्यामुळे समाज,किंवा गावाला त्रास होईल असे मी वागलो नाही. किलोमीटर मी प्रवास करून आलो .जेवण आणल्यावर मी माझ्या पत्नीशी 20 फुटावरून बोलतो.स्वतःची काळजी घेत इतरांची सुद्धा काळजी घेतो. माझ्या 12 व 9 वर्षांच्या मुलांना मी 2 महिने भेटलो नाही, त्यांना बघायची खूप इच्छा होते पण मी त्यांना बघू शकत नाही. अशी त्याची घालमेल सुरु असताना त्याला गहिवरुन आले.लॉक डाऊन असुन ही काही लोक पुणे मुंबई सारख्या शहरातून गावच्या ओढीने गावाकडे चोरी छूपे येत आहेत पण महेश येताच स्वःताच प्रशासना समोर दाखल झाल्याने त्याचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: घाणीत राहायचे की विकास हवा, हे नागरिकांनी ठरवावे : प्रकाश आंबेडकर, वंचितच्या हाती सत्ता द्या!

Post Office FD : बँक नाही, तर पोस्ट ऑफिसची FD ठरतेय फायद्याची; रेपो दराच्या कपातीनंतरही देते 7.5% पर्यंत व्याज

Vijay Hazare Trophy Schedule: रोहित शर्मा, विराट कोहली यांना खेळताना Live कुठे पाहता येणार? समोर आलं वेळापत्रक

Kolhapur Cheating Case : मुंबईमध्ये पोलिस अधिकारी आहे, ‘महसूल’ खात्यातील नोकरी देतो; कोल्हापुरातील एकाची आयुष्याची कमाई लुटली अन्...

RTE Admission 2026: खाजगी शाळांमध्ये मोफत शिक्षणासाठी लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होणार; मुलांचे वय किती असावे? वाचा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT