Institutions providing specialized training in such skills as construction or carpentry 
कोल्हापूर

'या' शाळेत ना दप्तराचे ओझे, ना तासाची घंटा... पण ही शाळा गरीब विद्यार्थ्याना देते भाकरी मिळवून देणारं शिक्षण...

अशोक तोरस्कर

उतूर (कोल्हापूर) - येथे दप्तराचे ओझे नाही. तासाची घंटा होत नाही. मात्र प्रार्थना होते. आयुष्यात भाकरी मिळवण्याचे प्रशिक्षण मिळते. नाष्टा,जेवण,रहाण्याची व्यवस्था मोफत मिळते. वर्षभरात विद्यार्थी संपुर्ण शिक्षण घेवून संस्थेतून बाहेर पडतो. स्वतःच्या कार्यकौशल्यावर आर्थिक प्राप्ती करु शकतो. गरीब विद्यार्थाना भाकरी मिळवून देणा-या या महत्वाकांक्षी उपक्रमाची सुरवात हुन्नर गुरुकुलच्या माध्यमातून उत्तूर (ता.आजरा) येथे तीन वर्षापुर्वी झाली.

सध्याच्या काळात देशांतर्गत विविध ठिकाणी बांधकाम क्षेत्रात प्रचंड प्रमाणात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे बांधकाम उद्योगाच्या सततच्या वाढत्या गरजा लक्षात घेता या क्षेत्रात कुशल प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता नेहमीच जाणवते. या व्यापक समस्येवर तोडगा म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून उद्योगतेला प्रेरणा देण्याच्या उदेश्याने “कॉज टू कनेक्ट” फौंडेशनने “हुन्नर गुरुकुल” या विशेष उपक्रमाची सुरवात केली. यामध्ये  १७ वर्षाहून अधिक वयोगटाच्या विद्यार्थ्यांना बांधकाम किंवा सुतारकाम अशा प्रकारच्या कौशल्यावर विशेष प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण सत्रासाठी ठराविक प्रक्रियेनंतर संपूर्ण देशातून २५ विद्यार्थ्यांची निवड करणेत येते.निवासी स्वरूपाच्या या प्रकल्पासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बांधकाम किंवा सुतारकाम यापैकी एका कौशल्यविषयक प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा पर्याय दिला जातो.प्रशिक्षण काळात होतकरू विद्यार्थ्यांसाठी निवास, भोजन तसेच शिक्षणाची व्यवस्था निशुल्क असते. प्रशिक्षण कालावधी हा एक वर्षाचा असून त्यामध्ये दोन महिन्याचा कालावधी प्रात्यक्षिक सरावासाठी राखीव असतो. प्रशिक्षणा दरम्यान २० दिवसांची वार्षिक रजा मिळू शकते. प्रशिक्षणा दरम्यान विद्यार्थ्यांना संबधित क्षेत्रातील अनुभवी व तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली प्रगत तंत्रज्ञानाची ओळख करून देणेत येते.

प्रशिक्षणाची सुरुवात दरवर्षी जून महिन्यात होते. मात्र या वर्षी कोरोनाच्या प्राश्वभुमीवर  प्रवेश प्रक्रिया एक महिना लांबणीवर पडली आहे.प्रशिक्षण सराव प्रात्यक्षिकासह अंदाजे मे महिन्यापर्यंत संपते. या दरम्यान प्रशिक्षणार्थ्याना वास्तुकला, बांधकाम, अभियांत्रिकी तसेच रचनाकार या क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध होते.  या मार्गदर्शन सत्राद्वारे प्रशिक्षणार्थीना संबधित विषयातील तज्ञ संयुक्त व्यावसाईक संस्था, स्वयंसेवी संस्था इत्यादी लोकांशी प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी बोलून सल्ला मसलत करण्याची संधी मिळते. स्थानिक परिस्थिती आणि संसाधनांना पूरक अशा कौशल्यावर आधारित असलेल्या या प्रशिक्षणाद्वारे तयार झालेले प्रशिक्षित युवक आपल्या गावात किंवा जवळपासच्या परिसरातच स्थानिक कारागिरांच्या सहकार्याने काम करू शकतात. त्यामुळे अशा युवकांना भविष्यात व्यवसाय किंवा रोजगारासाठी यापुढे गाव सोडून जावे लागणार नाही आणि त्याद्वारे त्यांचे जीवनमान सुधारण्याचे काम होईल. प्रशिक्षणानंतर यशस्वी विद्यार्थ्यांना स्वताच्या कार्यकौशल्यामुळे दरमहा रु.१०,००० ते १५,०००/- पर्यंत आर्थिक प्राप्तीच्या रोजगार संधी उपलब्ध होऊ शकल्याने त्यांच्या उज्वल भविष्याला “हुन्नर गुरुकुल” च्या माध्यमातून नवीन कलाटणी मिळेल या बद्दलचे आशादायी चित्र दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : चौथ्या दिवशीही शक्तीपीठाची मोजणी शेतकऱ्यांनी रोखली, पोलिसांसोबत वाद

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT