International Pen Show esakal
कोल्हापूर

International Pen : अबब.. तब्बल साडेपाच लाखांचा पेन! पेनाला 18 कॅरेट सोन्याचे नीब, आणखी काय आहे खासियत?

दोनशे रुपयांपासून ते साडेपाच लाख रुपयांपर्यंतचे पेन आता कोल्हापुरात पाहण्यास मिळणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

एन्सीएन्ट इजिप्त हा २०२३ या सालातील सर्वोत्कृष्ट पेन या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. त्याला हिऱ्यासारखे कार्बन कोटिंग असून, १८ कॅरेट सोन्याचे नीब आहे.

कोल्हापूर : अबब.., तब्बल साडेपाच लाखांचा पेन ! होय हे खरंच आहे. दोनशे रुपयांपासून ते साडेपाच लाख रुपयांपर्यंतचे पेन आता कोल्हापुरात पाहण्यास मिळणार आहेत. ‘आंतरराष्ट्रीय पेन शो’च्या (International Pen Show) निमित्ताने भारतासह जगभरातील ५० हून अधिक उच्च प्रतीचे ब्रॅण्ड्स व विविध प्रकारचे दोन हजारांहून अधिक पेन येथे पाहाण्यास आणि खरेदी करता येणार आहेत. उच्च दर्जाची शाई, पेन ठेवण्यासाठी खास पाऊच व केसेसही असणार आहेत.

विशेष म्हणजे पुण्यातील प्रसिद्ध ‘व्हीनस ट्रेडर्स’ यांचे पु. ल. देशपांडे, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासहीचे ही फाऊंटन पेन (Fountain Pen) असणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व लहान मुलांसाठी ‘चिंटू’चे पेनही असणार आहेत. फॉऊंटन पेन, रोलर पेन, बॉल पेन, मेकनाईज्ड पेन्सिल्सही पाहता येणार आहेत.

‘’बॉब ॲन्ड ची’’च्या वतीने २५ व २६ मे रोजी हॉटेल सयाजी येथे दोन दिवसांचा शो होणार आहे. सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश आहे. डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उद्योजक सचिन शिरगांवकर, अर्किटेक्ट शिरीष बेरी, प्रसाद कामत यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. २५) सकाळी साडेअकरा वाजता शोचे उद्‌घाटन होणार आहे, अशी माहिती ‘बॉब ॲन्ड ची’च्या संचालिका प्राची वाघ यांनी दिली. बुलढाणा येथील हस्ताक्षर कलाकार गोपाल वाकोडे हे मराठीतून स्वाक्षरी करण्याचे प्रात्यक्षिक दाखवणार आहेत.

पेनला सोन्याची नीब

एन्सीएन्ट इजिप्त हा २०२३ या सालातील सर्वोत्कृष्ट पेन या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. त्याला हिऱ्यासारखे कार्बन कोटिंग असून, १८ कॅरेट सोन्याचे नीब आहे. वजन ८६ ग्रॅम असून लांबी १३६ मिलीमीटर इतकी आहे. जगभरात फक्त ३७५ पेन उपलब्ध असून, त्याची किंमत साडेपाच लाख रुपये इतकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण, जीव गेला तर फडणवीस जबाबदार... मनोज जरांगे यांची कठोर भूमिका!

Arya Avdhut Success Story : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; आर्या अवधूतचा राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत विजय

Randhir Singh: क्रीडा प्रशासक रणधीर सिंग यांचे निधन; प्रदीर्घ आजाराने ७९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

स्कॉर्पिओला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत, मृतांमध्ये ZP सदस्यासह २ माजी सरपंचाचा समावेश

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगेंची पत्रकार परिषद! 30 मे पासून आमरण उपोषण

SCROLL FOR NEXT