In Jaysingpur Vendors To Be Tested For Antigen Kolhapur Marathi News
In Jaysingpur Vendors To Be Tested For Antigen Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

जयसिंगपूला विक्रेत्यांची होणार अँटिजेन चाचणी

गणेश शिंदे

जयसिंगपूर : शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांची कोरोना अँटिजेन चाचणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालिकेच्या बुधवारी झालेल्या ऑनलाईन सभेत घेण्यात आला. या वेळी विविध विषयांनाही मंजुरी देण्यात आली. नगराध्यक्षा डॉ. नीता माने अध्यक्षस्थानी होत्या. 

शहराच्या विकासासाठी टी.डी.आर. पॉलिसी राबविण्याच्या विषयालाही चर्चेनंतर मंजुरी देण्यात आली. नगरपरिषदेचे कर्मचाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी संपल्यानंतर त्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय घेऊन कोरोनाच्या काळात राबणाऱ्या या कर्मचाऱ्यांना दिलासा दिला. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी दलितवस्ती योजनेअंतर्गत प्रशासकीय कामाना मंजुरी देण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला. 

मुख्याधिकारी टिना गवळी यांनी विषय पत्रिकेवरील विषयाचे वाचन केले. यामध्ये शहरात भाजी व फळ विक्रेते यांच्याकडून शहरात कोरोना प्रसार होऊ शकतो. त्यामुळे सर्व फेरीवाले यांचे अँटिजेन चाचणी करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. नगरसेवकांनी या विषयाला एकमताने मंजुरी दिली. पालिकेचे शिपाई भंडारे यांची परविक्षाधिन कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना सेवेत कायम करण्याचे ठरले. शहराच्या विकास नियोजनबद्ध होणेसाठी तसेच सार्वजनिक सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी विकास आराखड्यातील आरक्षणे विकसित करणे, जमिनी संपादन करण्याचे ठरले. 

उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, नगरसेवक पराग पाटील, सर्जेराव पवार, महेश कलकुटगी, राहुल बंडगर, संभाजी मोरे, रेखा देशमुख, संगीता पाटील-चिंचवाड, संजय पाटील-कोथळीकर, स्वरुप पाटील-यड्रावकर, बजरंग खामकर, मुक्ताबाई वगरे यांच्यासह नगरसेवकांनी विविध विषयांवरील चर्चेत सहभाग घेतला. 

शहरातील 31 ठिकाणच्या कामांचे ठराव 
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती योजनेतून पालिकेला तीन कोटींचे अनुदान मिळाले आहेत. त्यातील 2.80 कोटींच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे, तर पालिकेकडून शहरातील विविध 31 ठिकाणी कामे करण्यासाठी 1 कोटी 75 लाख 61 हजाराच्या कामांना प्रशासकीय मंजुरीचा प्रस्ताव सादर करण्याचा ठराव मंजूर करण्याचे ठरले. 

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT