jilebi motichur whats app dilivery business in vadgaon kadegaon 
कोल्हापूर

आचारी पठ्ठ्यानं 'बंदी'तही शोधली संधी... व्हाॅट्स अॅप द्वारे घरपोच लाडू,जिलेबीची...

स्वप्निल पवार

देवराष्ट्रे (सांगली) - कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी केली आहे.त्यामुळे सर्व व्यवसाय लॉक झाले आहेत.लग्न सोहळे, आदी कार्यक्रम  रद्द झाले आहेत. त्यामुळे केटरिंग व्यवसायावरही संकट आले. परंतू मोहित्यांचे वडगाव ता.कडेगाव येथील केटरिंग व्यवसायिक अनिल निकम यांनी संचारबंदीतही संधी शोधली आहे.'संकट कधी आपला नाश करू शकत नाही.युक्ती वापरली तर अनेक मार्ग खुले होतात.' असं त्यांचं मत आहे. शेतात राहणारा अनिल निकम दररोज व्हाॅट्स अॅपच्या माध्यमातून तेरा हजार रुपयांचा माल विकत आहे.सोशल मीडियावर तासन् तास वाया घालवणाऱ्या तरुण पिढीला हा एक आदर्श घालून दिला आहे.

यावर्षी लग्न सोहळ्याचे मुहूर्त जास्त होते.हंगाम चांंगला जाणार आणि चांगली कमाई होणार अशी आशा होती. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि संपूर्ण देश थांबला. संचारबंदी जाहीर झाली. लग्नसोहळे रद्द करण्यात आले.  पुणे,मुंबईसह परराज्यातून अनेकजण आपल्या मायभूमीत परतली. नागरिकांनी गावच्या सीमा बंद केल्याने परिसरात फिरणे अवघड झाले.

खवय्यांना घरपोहच चविष्ट पदार्थ 

या सर्व परिस्थितीत न डगमगता 'बंदी'तही कशी मिळेल, आपला व्यवसाय चालेल याकडे अनिल निकम यांनी लक्ष दिले आणि घरातच आचारी काम सुरु केले. पदार्थ पार्सल स्वरुपात मिळतील अशी व्हाॅट्स अॅपच्या माध्यमातून सर्वत्र जाहिरात केली. हॉटेल बंद असल्याने या खवय्यांना चविष्ट पदार्थ निकम देत आहेत. दररोज मोतीचूर लाडू 50 किलो, जिलेबी 25 किलो, वडापाव 200,भड़ंग10 किलो, गुलाबजामुन 9 किलो, बालुशा 7 किलो अशी रोज विक्री होते यातून प्रतिदिन तेरा हजार सातशे पन्नास रुपये मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT