Corona JN.1 Variant esakal
कोल्हापूर

Corona JN.1 Variant : कोरोनाच्या नव्या अवताराची राज्यात दहशत; सिंधुदुर्गनंतर कोल्हापुरात आढळला कोरोनाबाधित रुग्‍ण

राज्यात जेएन. १ कोरोनाचा (JN. 1 Corona) शिरकाव झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

जिल्ह्यात ३३ लाख लोकांना कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण झाल्याने कोरोनाचा धोका टळला आहे.

कोल्हापूर : ‘‘राज्यात जेएन. १ कोरोनाचा (JN. 1 Corona) शिरकाव झाला आहे. यापाठोपाठ काल (गुरुवार) कोल्हापुरातही एक तरुण कोरोनाबाधित सापडला आहे. त्याला घरात क्वारंटाईन केले आहे. तो कोरोनाबाधित आहे; जेएन. १ ची लागण नाही. लोकांनी घाबरून न जाता मास्कचा वापर करावा,’’ अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक (Health Department) डॉ. सुप्रिया देशमुख यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

आयसोलेशनमध्ये चाचणी झाली; तेव्हा त्याचा अहवाल कोरोनाबाधित आला. त्याला घरीच क्वारंटाईन केले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, त्याच्या थुंकीचा नमुना राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठवला आहे. त्याचा अहवाल दोन दिवसांत येणार आहे.

जिल्ह्यात ३३ लाख लोकांना कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण झाल्याने कोरोनाचा धोका टळला आहे. असे असले तरी ज्यांना गंभीर आजार आहेत, अशा व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. अशा व्यक्तींनी जास्त खबरदारी घेण्याची गरज असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशीर मिरगुंडे म्हणाले, ‘‘कोरोनाचा जेएन. १ व्हेरिएंट वेगाने पसरणारा असला, तरी तो जीवघेणा नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. सीपीआरमध्ये कोरोना उपचारासाठी स्वतंत्र कक्ष आहे. ३५ आयसीयू बेड आहेत. चाचणीसाठी जिल्हा प्रयोगशाळा आहे. वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक येथे आहे. औषध साठाही पुरेसा आहे. त्यामुळे लक्षणे दिसताच रुग्णांनी घाबरून न जाता तातडीने तपासणी व उपचार घ्यावेत.

अशी घ्या दक्षता!

  • गर्दीची ठिकाणे टाळा

  • मास्कचा वापर करावा

  • लक्षणे दिसताच वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला व उपचार घ्यावेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : कारच्या एअरबॅगचा ब्लास्ट, चालक तरुणाचा मृत्यू

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २७ जून २०२६ ते ३ जुलै २०२६ - मराठी राशी भविष्य

निवडणुकीतील पराभवानंतर विरोधकांमध्ये फूट! मोठ्या पक्षाने ९ वर्षांची साथ सोडत युती तोडली; राजकीय गणित बिघडले

SCROLL FOR NEXT