jotiba mandir closed because of corona effect  
कोल्हापूर

जोतिबा मंदिराच्या इतिहासात प्रथमच घडलीय 'ही' घटना....

निवास मोटे

जोतिबा डोंगर -  कोरोनाचा संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी आज प्रशासनाने श्री. क्षेत्र जोतिबा डोंगर ता.पन्हाळा येथील दख्खनचा राजा श्री.जोतिबा देवाचे मंदिर बंद ठेवले. जिल्हाधिकारी दौलत देसाई  जोतिबा डोंगरावर जमावबंदी आदेश लागू केल्यामुळे आज मध्यरात्रीपासून मंदिराचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले. येणाऱ्या सर्व भाविकांना दरवाजातून मुख दर्शन घ्यावे लागले. डोंगरावरील इतिहासात मंदिर दिवसभर बंद ठेवण्याची ही पहिलीच घटना आहे. प्रशासन आज मंदिर बंद ठेवणार आहे.

मंदिरात फक्त पुजारी वर्गाला प्रवेश

याबाबतची ग्रामस्थ,पुजारी,भाविक यांना कोणतीही पूर्वकल्पना नव्हती.त्यामुळे डोंगरावर आलेले भाविक गोंधळून गेले. आज रविवार असल्याने डोंगरावर नेहमी प्रमाणे भाविक आले. गर्दी ही थोडी कमी प्रमाणात होती. पण मध्यरात्री पासूनच प्रशासनाने मंदिराचे सर्व दरवाजे कुलूपबंद केले. मंदिरात फक्त पुजारी वर्गाला प्रवेश दिला गेला. मंदिर बंद केल्याची बातमी सोशल मिडियाव्दारे  राज्यभर वाऱ्यासारखी पसरली. येणारे काही भाविक कोल्हापुरातून काही डोंगर घाटातून परतले. सकाळी अकरा वाजल्यापासून पोलीस यंत्रणेने दानेवाडी,गिरोली,चव्हाण तळे या ठिकाणी नाका बंदी करुन भाविकांना डोंगरावर प्रवेश दिला नाही. त्यामुळे भाविकांना केवळ डोंगराचे दर्शन घेऊन परतावे लागले. 

आज मंदिर बंद ठेवल्याच्या घटनेने जोतिबाच्या चैत्र यात्रे बाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. ७ एप्रिल रोजी होणारी चैत्र यात्रा होणार का ? जिल्हाधिकारी या यात्रेबाबत काय निर्णय घेणार ?याकडे ग्रामस्थ,पुजारी, भाविक सासन काठीधारक यांच्या नजरा लागल्या आहेत.

प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन

दरम्यान , पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिर परिसरात कोरोना बाबतची जनजागृती करण्यासाठी ठिकठिकाणी  डिजीटल फलक लावले आहेत. येथील मिनी सरकारी दवाखाना यांच्या वतीने डोंगरावर सर्व यंत्रणा सज्ज ठेवली होती. दरम्यान, शासकीय यंत्रणेने डोंगरावर गर्दी करू नका. आरोग्याची काळजी घ्या. प्रशासनास सहकार्य करा असे आवाहन भाविकांना केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT