jotiba tempal festival stop in 30 march covid 19 impact kolhapur marathi news 
कोल्हापूर

जोतिबाची चैत्री यात्रा रद्द; करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरासह सर्व मंदिरे 30 एप्रिलपर्यंत दर्शनासाठी बंद

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  : शासनाने दिलेल्या आदेशानुसार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारीतील करवीर निवासिनी अंबाबाई, दख्खनचा राजा जोतिबा मंदिरासह सर्व मंदिरे 30 एप्रिलपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहेत. त्याशिवाय 26 एप्रिलला होणारी जोतिबाची चैत्री यात्राही रद्द करण्यात आली आहे. मात्र, या काळात सर्व धार्मिक विधी मोजक्‍याच पुजारी व सेवेकरी यांच्या उपस्थितीत होतील, अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी आज दिली. 

वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर आज समितीच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.

जोतिबाच्या चैत्र यात्रेला प्रत्येक वर्षी लाखो भाविक येतात. गेल्या वर्षीही कोरोनामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली होती. चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी 27 एप्रिलला करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव होतो. कोल्हापूरकरांचा लोकोत्सव असणाऱ्या या सोहळ्याला हजारो भाविकांची उपस्थिती असते. हा सोहळाही गेल्या वर्षीप्रमाणेच प्रतीकात्मक पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: मेघगर्जनेसह उष्णतेचा इशारा! राज्यातील 'या' जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार; हवामान विभागाचा अलर्ट

IND A vs AFG A: वैभव सूर्यवंशीला फायनलमध्ये टार्गेट करणार? श्रीलंकेच्या कर्णधाराने दिलं स्पष्ट उत्तर, 'आमचे खेळाडू कोणालाही...'

EPFO Interest Rate 2026: 7 कोटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! व्याजदराच्या प्रस्तावाला सरकारची मंजुरी; खात्यात पैसे कधी जमा होणार?

Claude AI काय आहे? जबरदस्त फीचर्स, कमाल फायदे; तुमच्या रोजच्या कामांना बनवेल एकदम सोपं, मित्रासारखी करेल मदत

Latest Marathi Live Updates: नागपुरातील विद्यार्थ्याला बदलून मिळाले Neet फेरपरीक्षेचे केंद्र

SCROLL FOR NEXT