Journey of Khandu wrestlers from Gulbarga to Kolhapur story by matin shaikh 
कोल्हापूर

पैलवान ते मालिशवाला प्रवास : हात फिरवला की सर्व थकवा गायब

मतीन शेख

कोल्हापूर : तब्बल ४२ वर्षांपूर्वीची गोष्ट. शाहू महाराजांच्या कोल्हापुरात कुस्तीसाठी पैलवानाला किंमत आहे, असे देगाव (जि. गुलबर्गा) येथील खंडेराव कोल्लगे यांना समजले अन्‌ त्यांनी थेट कोल्हापूर गाठलं. एका पैलवानाच्या मेहतनीने थकलेल्या शरीरावर खंडू पैलवानने हात फिरवला की सर्व थकवा गायब व्हायचा, हे त्यांचं वैशिष्ट्य. आणि सुरू झाला पैलवान ते मालिशवाला असा प्रवास... 


खंडेराव यांची गावाकडची परिस्थिती हलाखीची. काम कराल तरच खाल, अशी अवस्था. त्यात कुस्तीचा प्रचंड छंद जडला. मोलमजुरी करायची अन्‌ शेजारच्या गावच्या जत्रा-यात्रेत भरणाऱ्या कुस्तीच्या फडात उतरायचं. अगदी रुपया, दोन रुपये इनामावर कुस्ती लढायची. पै- पै जोडून गुजराण सुरू होती. त्यात कोल्हापुरातल्या तालमीचे वेड लागले. कोल्हापुरात पोचत मठ-तालमींत मुक्काम ठोकला. कुस्तीचा सराव सुरू झाला. रोजच्या खुराकाला पैसा हवा होता. सुरवातीला तालमीतल्या मुलांनी सांभाळून घेतलं. पुढं मात्र खुराकाची वानवा निर्माण झाली.

गावाकडे तर परतू शकत नाही, आता करायचं काय, असा प्रश्न खंडेराव यांच्यापुढे होता. शेवटी हॉटेलमध्ये काम करायचं ठरवलं. जोर- बैठका मारणारं शरीर आता हॉटेलमध्ये राबायला लागलं. पण, कुस्ती सोडली नाही. हॉटेलमध्ये काम करायचं, आखाड्यात सराव करायचा अन्‌ कोल्हापूरच्या शेजारच्या गावात होणाऱ्या कुस्ती स्पर्धेत सहभागी होत कुस्तीही साधायची, असा प्रवास सुरू होता. दुधासाठी लागणारा पैसा नसल्याने दुधाचा रतीब बंद झाला. 

दुधासाठी रोज पैसे कोठून आणायचे, हा प्रश्न निर्माण झाला. एका मल्लाने त्यांना सुचवलं, ‘तू इतर पैलवानांची मालिश कर, तुला ते पैसे देतील.’ त्यांनी ऐकलं आणि विविध आखाड्यांतल्या पैलवानांचे मालिश करणे सुरू केले. कोणी पैसे द्यायचे, तर कोणी तूप, बदाम. मिळालेल्या पैशांतून दूध कट्ट्यावर जाऊन खंडेराव दूध घेऊ लागले. या काळी होणाऱ्या कोल्हापूर महापौर केसरी कुस्ती स्पर्धेत त्यांनी त्यांच्या वजन गटात द्वितीय क्रमांक पटकावला. ‘खंडू पैलवान मालिशवाले’ अशी त्यांनी कोल्हापुरात ओळख निर्माण केली. मल्लांची मालिश करायची, हॉटेलमध्ये कामही करायचं आणि कुस्तीचे फडही गाजवायचे असा तीन कलमी कार्यक्रम सुरू होता. 


पुढे गावाकडे त्यांची लग्नगाठ बांधली गेली. पण, गावी काय त्यांचे मन रमेना. काही दिवसांत ते कोल्हापूरला परतले. गंगावेश, मोतीबाग, काळाईमाम, शाहूपुरी मठ अशा सर्व तालमींतील मल्लांना मालिशसाठी खंडू पैलवान यांना मागणी होती. संसाराचा खर्च भागेना, मग मोठा मुलगाही हॉटेलकामात मदत करू लागला. तालमीतल्या मल्लांना खंडू पैलवानांच्या मालिशची सवय लागली होती. कोल्हापुरात ते कुठेही असले तरी त्यांना शोधून आणलं जाऊ लागलं.

मुलाला चांगला पैलवान करण्याचा चंग
छोट्या मुलाला खांद्यावर घेऊन मल्लांच्या मालिशसाठी ते फिरत. छोटा मुलगा चांगला मल्ल घडावा, यासाठी ते सध्या झटत आहेत. मालिशच्या पैशातून मुलाला पैलवान करण्याचा चंग त्यांनी बांधलाय. गंगावेश तालमीत मुलगा शरणकुमारचा सराव सुरू असून, मुलाला मोठा मल्ल बनवण्यासाठीची मालिशवाल्या बापाची ही गोष्ट प्रेरणादायी आहे.

संपादन - अर्चना बनगे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आज अचानक उतरले सोन्याचे दर! किती हजारांनी स्वस्त झालं, पाहा एका क्लिकवर

India vs Pakistan Asia Cup : 'ऑपरेशन सिंदूर'वरून भारताला डिवचणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूंनी किती धावा केल्या? पाहा स्कोअर कार्ड..

BJP Protest : मोदींच्या आईचा AI व्हिडिओ; भाजप महिला आघाडीचे काँग्रेसविरोधात आंदोलन

Latest Marathi News Updates : पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप, वाहनचालकांची गैरसोय; नागरिकांना प्रशासनाचे आवाहन

Ahilyanagar Rain Update: 'नेवासे तालुक्‍यात धो-धो पाऊस; शेतकऱ्यांचे नुकसान', कांदा उत्पादकांची धावपळ

SCROLL FOR NEXT