jyotiba temple festival closed for this year decision of western maharashtra samiti in kolhapur 
कोल्हापूर

जोतिबा मंदिर यंदाही खेट्यांच्या कालावधीत बंदच ; इतर दिवशी मात्र दर्शन सुरु

निवास मोटे

कोल्हापूर : जोतिबा डोंगरावरील जोतिबा मंदिर खेट्यांच्या कालावधीत भाविकांना बंद राहणार असून, इतर दिवशी मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे, अशी माहिती पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, दरवर्षी जोतिबा डोंगरावर रविवारच्या खेट्यांना लाखो भाविक हजेरी लावतात. यंदा २८ फेब्रुवारीपासून जोतिबाच्या खेट्यांना सुरुवात होत आहे. ७, १४, २१ व २८ मार्चला खेटे असणार आहेत.

जिल्हा आपत्ती प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात आपत्तीजनक परिस्थिती उद्‌भवू नये, यासाठी २८ पासून खेटे होणार नाहीत. मात्र, पारंपरिक पद्धतीने धार्मिक विधी कमीत कमी मानकरी व पुजारी यांच्या उपस्थित होईल. अन्य दिवशी मंदिर दर्शनासाठी भाविकांना खुले राहणार असले तरी त्यांनी शासकीय नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे. मास्क बंधनकारक आहे. सॅनिटायझरचा वापरही आवश्‍यक असून तापमान तपासणी करायची आहे. सुरक्षित अंतर ठेवून मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT