jyotiba temple festival tradition which dates back to ancient times continues  
कोल्हापूर

प्राचीन काळापासून जोतिबा डोंगरावर सुरू असलेली 'ही' परंपरा आजही अखंडीत

निवास मोटे

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : श्री क्षेत्र जोतिबा डोंगर ता. (पन्हाळा ) येथे दरवर्षी खंडे नवमी दिवशी पहाटेच्यावेळी जोतिबा डोंगरावरील सर्व सुवासिनी महिला नटून थटून जोतिबा मंदिर व परिसरातील सर्व देव देवतांना दिवे ओवाळतात. प्राचीन काळापासून सुरू असलेली ही परंपरा आजही सुरू आहे. आजही हा सण जोतिबा डोंगरावर मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो . पहाटे नटून-थटून सुहासिनींची पावले  पावले मंदिराकडे वळतात. पायरी रस्त्याने दिवे घेऊन येताना चे दृश्य मोहून टाकणारे असते. मंदिरातील सर्व देव देवतांना ओवाळले  जाते . सूर्योदयापूर्वी हा सोहळा होतो.


 या सोहळ्या विषयी असे सांगितले जाते की, दख्यनचा राजा श्री जोतिबा देवाने रत्ना सूर , रक्तभोज या राक्षसासह आणखी पाच राक्षसांचा वध केला. विजयादशमी दिवशी दख्खनच्या राजा जोतिबा देवांनी हा पराक्रम केला म्हणून या पराक्रमाची आठवण म्हणून डोंगरावर पंचप्राण ज्योतीचे प्रतीक म्हणून सुवासिनीनी ही दिवे ओवाळणीची प्रथा सुरू केल्याचे सांगितले जाते . दिवे तयार करण्यासाठी तांदळापासून पीठ तयार केले जाते. ते चुलीवर शिजवले जाते . त्यापासून विशिष्ट आकाराचे दिवे तयार करून त्यात तूप व वातू घालून ते प्रज्वलीत करण्यात येतात. महिलांच्या लगबगीने संपूर्ण डोंगर जागा असतो . दरम्यान , यंदा दिवे ओवाळणीचा सोहळा कोरोना संसर्गामुळे  अत्यंत साध्या पद्धतीने झाला .डोंगरावर या सणास मोठे पारंपारीक महत्व आहे .

हेही वाचा- ‘यायला लागतय’ म्हटले की दुचाकी गाडी घेऊन तयार असणाऱ्या ट्रक मेकॅनिक ते परिवहन सभापतीचा प्रवास -

 जोतिबा डोंगरावर दिवे ओवाळणीची प्रथा आजही कायम आहे. आज कोरोनामुळे मंदिर बंद आहे. तरीसुद्धा बाहेरून आम्ही दिवे ओवाळणी करून ही प्रथा कायम  ठेवली आहे. यंदा साध्या पद्धतीने हा सोहळा महिलांनी केला .
सौ राधा बुणे, सरपंच, जोतिबा डोंगर ता. पन्हाळा .


संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा उलटफेर! खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली; आज किती आहे 10 ग्रॅम सोन्याचा भाव?

आमदार निधी कुठे वापरला? हिशोब मतदारांपुढे ठेवणारा लोकप्रतिनिधी; कोण होते प्रा. बी.टी. देशमुख?

Uddhav Thackeray: आदित्य ठाकरेंवर टीका करणाऱ्या खासदारांसह ट्रोलर्सना उद्धव ठाकरेंनी खडसावलं

Latest Marathi Live Updates: श्रीरामपूरमध्ये 17 वर्षीय युवकावर चाकू हल्ला; प्रकृती गंभीर, नाशिकला हलवले

Lionel Messi Controversy: लिओनेल मेस्सीच्या विरोधात Fifa कडे दाखल झाली तक्रार; अर्जेंटिनाच्या सुपरस्टारवर एका सामन्याच्या बंदीची कारवाई? नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT