Jyotiba Yatra 2023 Adimaya Chopdai Devi Shravan Shashti Yatra esakal
कोल्हापूर

Jyotiba Yatra 2023 : जोतिबा डोंगरावर यात्रेची जय्यत तयारी, कधी आहे यात्रा? यंदा उच्चांकी गर्दीची शक्यता

यात्रेत उच्चांकी गर्दी होण्याची शक्यता, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातमधून येणार भाविक

सकाळ डिजिटल टीम

यात्रेच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच काही व्यापारी नारळ, मेवामिठाई यांचा माल भरू लागले आहेत.

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : श्री क्षेत्र जोतिबा मंदिरातील (Jyotiba Temple) आदिमाया चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा येत्या २२ ऑगस्ट रोजी होत असून या यात्रेची तयारी सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

यंदा श्रावणषष्ठी यात्रा (Jyotiba Yatra 2023) पूर्ण क्षमतेने होत आहे, त्यामुळे या यात्रेत उच्चांकी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने यात्रेचे नियोजन करण्यात येत आहे. पन्हाळा गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांनी डोंगरावर येऊन गल्लोगल्ली गटर्स स्वच्छता तसेच पिण्याच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या ठिकाणी पाहणी केली.

ज्या त्रुटी दिसल्या त्या दूर करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. येत्या सोमवारी षष्ठी यात्रेची चौथी आढावा बैठक प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या राज्यातून सुमारे तीन लाख भाविक येतात. या यात्रेचे वैशिष्ट्ये म्हणजे, ही यात्रा रात्रभर असते.

पहाटे धुपारती अंगारा होऊन यात्रेची सांगता होते. यात्रेसंदर्भात जोतिबा डोंगरावर पन्हाळ्याचे प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे-जाधव, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, देवस्थान समितीचे अधीक्षक धैर्यशील तिवले, सरपंच राधा बुणे, कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांच्या उपस्थितीत तीन आढावा बैठका झाल्या आहेत.

यात्रेच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच काही व्यापारी नारळ, मेवामिठाई यांचा माल भरू लागले आहेत. वाहनांचे पार्किंग करण्यासाठी दरवर्षी सपाटीकरण करण्यात येते. पण यंदा सलग पावसामुळे हे काम करताना अडचणी येत होत्या. मात्र, गुरुवारपासून पावसाने उघडीप दिल्याने हे काम सुरू झाले आहे. यात्रेत भाविकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Treasure Discovery: समुद्राखाली सापडला खजिना... ३०० वर्षांपूर्वी सोन्या-चांदीच्या नाण्यांनी भरलेले जहाज सापडलं, किंमत किती?

NCC Honors Mumbai Groundsmen : ग्राऊंड्समन हेच मुंबई क्रिकेटचे 'अनामिक नायक', NCC कडून मुंबईतील ‘ग्राऊंड्समन’चा सन्मान

iPhone 16 Pro ची किंमत अचानक कोसळली; मिळतोय चक्क 50 हजारपेक्षा जास्त डिस्काउंट, खरेदीसाठी ग्राहकांची रांग, इथे सुरुय ऑफर..

महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची गर्जना ! 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई सिनेमामधून

Ind vs WI 2nd Test : कुलदीप यादवच्या चक्रव्यूहमध्ये फसला वेस्टइंडीज; २४८ धावांवर ऑलआऊट, फॉलोऑनची नामुष्की

SCROLL FOR NEXT