Siddhagiri Math Kadsiddheshwar Swami esakal
कोल्हापूर

Political News : कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराज भाजपात प्रवेश करणार? स्वामी म्हणाले, मी राजकारणात जाणं..

कोल्हापूरच्या राजकारणात (Kolhapur Politics) मोठा फेरबदल होणार अशी चर्चा रंगली असतानाच, आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Kolhapur News : कोल्हापूरच्या राजकारणात (Kolhapur Politics) मोठा फेरबदल होणार अशी चर्चा रंगली असतानाच, आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. कणेरीतील सिद्धगिरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी (Siddhagiri Math Kadsiddheshwar Swami) भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा सुरु आहे.

मात्र, भाजप (BJP) प्रवेशाबाबत काडसिद्धेश्वर स्वामींनी आपलं मत व्यक्त केलंय. या जन्मात तरी मी राजकारणात जाणं शक्य नाही, अशा स्पष्ट शब्दात स्वामींनी भाजप प्रवेशाच्या चर्चेवर पडदा टाकला.

एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. गेल्या काही दिवसांपासून काडसिद्धेश्वर स्वामी भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा सुरु होती. स्वामी हे भाजपतर्फे लोकसभेचे उमेदवार असतील, ते राज्यसभेवर जाणार अशाही चर्चा रंगल्या होत्या.

स्वामींनी भव्य असा ‘सुमंगल’ महोत्सव आयोजित केल्यानंतर तर महाराज भाजपमध्ये प्रवेश करणार या चर्चेला ऊत आला. त्यांची भाजपशी वाढती जवळीक आणि हे सगळं निवडणुकीसाठीच सुरू असल्याची चर्चा जनमाणसांत मोठ्या प्रमाणावर आहे.

त्यामुळं त्यांनीच आता आपण या जन्मी तरी राजकारणात जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय. मी संन्यासी आहे आणि संन्यासत्व हे जगात श्रेष्ठ मानतो, त्यामुळं आतापर्यंत मला अनेक विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊ केली. राज्य पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार देण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु, मी सर्वांना नम्रपणे नकार दिला, असं सांगत त्यांनी भाजप प्रवेशाची चर्चा फेटाळून लावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT