कागल : देशातील सहकारी साखर कारखान्यांची शिखर संस्था नवी दिल्ली येथील नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज संस्थेने येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास उच्च साखर उतारा विभागातील देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना हा मानाचा पुरस्कार जाहीर केला. हंगाम २०२०-२१ साठी पुरस्कार मिळाला असून कारखान्यास आजअखेर मिळालेला हा ६४ वा तर राष्ट्रीय पातळीवरील २३ वा पुरस्कार आहे. राज्य पातळीवरील ४१ पुरस्कार मिळाले आहेत.
कारखान्याचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे यांच्या कारकिर्दीत कारखान्यास राज्य व राष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या पुरस्कारांची संख्या ५५ आहे. त्यांच्या पश्चात समरजितसिंह यांच्या कारकिर्दीतील हा नववा पुरस्कार आहे. पुरस्कार निवडीबाबतचे पत्र राष्ट्रीय साखर महासंघाचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी कारखान्यास पाठविले आहे. पुरस्कार वितरण सोहळा १६ नोव्हेंबरला नवी दिल्ली येथे आहे.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटून आनंद उत्सव केला. शाहू ग्रुप विविध संस्था तसेच सभासद शेतकऱ्यांच्या वतीने समरजितसिंह घाटगे यांचा सत्कार केला. पुरस्कारामुळे शाहू साखर कारखान्याचे सभासद, शेतकरी, अधिकारी कर्मचारी, हितचिंतक, पुरवठादार यांच्यात समाधानाचे वातावरण पसरले आहे.
यावेळी उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते.
मिळालेला पुरस्कार राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी हिताच्या कृतीचा वारसा, कारखान्याचे संस्थापक विक्रमसिंहजी घाटगे यांनी घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे व त्याला सभासद शेतकऱ्यांनी दिलेली साथ, अधिकारी, कर्मचारी, पुरवठादारांच्याकष्टाची जोड यांचाच हा गौरव आहे. हा गौरव शाहू परिवारातील परिवारातील प्रत्येक घटकाचा आहे.
- समरजितसिंह घाटगे, अध्यक्ष शाहू साखर कारखाना
आजअखेर मिळालेले पुरस्कार
सर्वोत्कृष्ट साखर कारखाना ः ४
उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना ११
तांत्रिक कार्यक्षमता ः २२
उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन ः ९
उत्कृष्ट ऊस विकास व्यवस्थापन ः ९
उत्कृष्ट डिस्टीलरी व्यवस्थापन ः १
जास्तीत जास्त साखर निर्यात ः २
प्रशंसा प्रशस्तीपत्र - १ इतर पुरस्कार - ५ एकूण ६४.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.