karnataka police maharashtra kolhapur shiv sena 
कोल्हापूर

कोगनोळीजवळ शिवसैनिकांना धक्काबुक्की ; कर्नाटक पोलिसांची अरेरावी  

सकाळ वृत्तसेवा

कागल : बेळगाव पालिकेच्या प्रांगणात लावलेला लाल पिवळा ध्वज हटवणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ तसेच भगवा ध्वज फडकवण्यासाठी निघालेल्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कोगनोळी टोलनाक्‍यावर रोखले. कर्नाटक पोलिसांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना दमदाटी करत शिवसैनिकांना धक्काबुक्की केली. 

28 डिसेंबर 2020 ला कन्नडिगांनी बेळगाव महापालिका कार्यालयासमोर लाल पिवळा ध्वज फडकवला. त्यामुळे मराठी जनतेमध्ये संतापाची लाट उसळली. याच्या निषेधार्थ कोल्हापुरात कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या पुतळ्याचे दहनही केले होते. हा बेकायदा लावलेला ध्वज 21 जानेवारीच्या आत हटवावा, अन्यथा ध्वज काढण्यासाठी विराट मोर्चा काढण्याचा इशारा महाराष्ट्र एकीकरण समिती व शिवसेनेकडून दिला होता. 

या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्रीपासूनच कर्नाटक पोलिसांनी कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी सुरू केली. याची कुणकुण लागताच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे, प्रभाकर खांडेकर, सुनील शिंदे, संग्राम कुपेकर यांच्यासह कार्यकर्ते आदल्या दिवशीच बेळगावकडे रवाना झाले होते; मात्र या सर्वांना शिनोळी येथे रोखले.

आज सकाळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे आदी शिवसैनिकांना लिंगनूर कापशीमार्गे अर्जुननगरजवळ रोखले. त्यानंतर या सर्वांनी आपला मोर्चा महामार्गावरील कोगनोळीकडे वळविला. मात्र कोगनोळीजवळही कर्नाटक पोलिसांनी त्यांना अडविले. यावेळी कर्नाटक पोलिस आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाली. मात्र त्यांना कर्नाटकात सोडले नाही. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

SCROLL FOR NEXT