karvir tehsil village nigave dumala people take decision not fasting in navratri festival for this year 
कोल्हापूर

नवरात्रीत यंदा नैवेद्य, उपवास नाहीच ; निगवे दुमालात ग्रामस्थांचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

शिये (कोल्हापूर) : निगवे दुमाला (ता. करवीर) येथील ग्रामदक्षता समिती व ग्रामपंचायतीच्या वतीने नवरात्र व दसरा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेऊन उपवास न करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात सापडलेले रुग्ण व तिघांचा झालेला मृत्यू गावासाठी धोकादायक आहे. शिवाय सध्या गावामध्ये सर्दी, खोकला, ताप अशा आजारांचे अनेक रुग्ण आहेत. त्यातून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. हा संभाव्य धोका ओळखून ग्रामस्थांच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. 

याबाबत समितीने विशेष नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार गावातील कोणत्याही व्यक्तीने नवरात्र उपवास करण्याचा नाही. नवरात्रात मंदिर बंद राहतील. जागर, सीमोल्लंघन, खंडेनवमीची पालखी निघणार नाही. नवरात्र काळात कोणाचाही नैवैद्य मंदिरात स्वीकारला जाणार नाही. जागरादिवशी कोणत्याही मंदिरात ऊस घेतला जाणार नाही. नवरात्र काळात बाहेरील गावातील लोकांना तेल घालण्यासाठी प्रवेश दिला जाणार नाही. 

मंदिरामध्ये फक्त पाच पुजाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. गावामध्ये दुर्गामातेची मूर्ती प्रतिष्ठापित करता येणार नाही. बैठकीस प्रशासक संदेश भोईटे, बत्तास चौगले, पंडित लाड, सुरेश पाटील, रणजित पाटील, पांडुरंग रानडे, योगेश कांबळे, अनिल खोत, बंडोपंत जासूद आदी उपस्थित होते. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Import Duty Cut : सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेल होणार स्वस्त; केंद्र सरकारकडून खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी कपात, सामान्यांना दिलासा

धोनीचा असा जल्लोष परत कधीचं पाहिला नाही! पहिला T20 World Cup जिंकल्यावरच्या सेलिब्रेशनचा Viral Video

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

Congress MLA Resignation : मतदार संघात दुष्काळ जाहीर न केल्याने काँग्रेस आमदार पाटील यांचा राजीनामा

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

SCROLL FOR NEXT