kashinath patil case in ratnagiri kolhapur complaint reported Kashinath arrested at Karveer police station eight days ago 
कोल्हापूर

बाप रे; शिर धडावेगळे केले अन् गावात येऊन ओरडून सांगू लागला

राजू पाटील

राशिवडे बुद्रुक (कोल्हापूर) : म्हशीने शेतातील वैरण खाण्याच्या किरकोळ भांडणातून राग मनात ठेवून कुरूकली (ता करवीर) येथे एका युवकाने दुसऱ्या एका युवकाचा निर्घृण खून केला. भोगावती कॉलेजच्या रस्त्यावरच कोयत्याने सपासप वार करून हा खून झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. काशिनाथ उर्फ किशोर साताप्पा पाटील (वय ३०) असे मृत्यू झालेल्याचे नाव असून किरण हिंदुराव पाटील (वय २७) याला याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.

 याबाबत पोलिसांनी व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी :

दहा दिवसापूर्वी कुरूकली नदी घाटरस्तावर असलेल्या किरण च्या शेतातील हत्ती गवत काशिनाथ यांच्या म्हशीने खाल्ले याबाबत किरण आणि काशिनाथ व त्यांच्या कुटुंबात वाद झाला होता. यामध्ये झालेली शिवीगाळ व मारहाण याचे सल मनात ठेवून किरणने बदला घेण्याची धमकी दिली होती. यानंतर गावातील पंच व दोन्ही कुटुंबातील लोकांनी एकत्र येऊन या प्रकरणावर पडदा पाडला होता. तरीही किरण हा अधूनमधून धमकी देत होता याची दखल घेऊन काशिनाथ याने आठ दिवसापूर्वी करवीर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार देऊन आपल्या जीवितास धोका आहे. असेही नमूद केले होते. याकडे पोलिसांनीही गांभीर्याने बघितले नाही. अखेर या धमकीचा परिणाम आज खुणात झाला.

  आज सकाळी किरण हा आपल्या कॉलेज कडील खडीचा माळ या शेताकडून दुचाकीवरून गावाकडे येत असताना कोल्हापुर-राधानगरी या राज्य मार्गाच्या  पन्नास मीटर अंतरावरच किरणने कोयत्याने काशिनाथ वर हातावर पायावर वार केले. जखमी होऊन कोसळलेल्या काशिनाथ वर पुन्हा मानेवर वर्मी वार घातला. हा वार एवढा खोल होता की मान कांही भाग राहता जवळजवळ धडा वेगळीच झाली होती. त्याच क्षणी त्याचा मृत्यू झाला. यानंतर आरोपी किरण हा गावातील चौकात कोयत्यासह येऊन ओरडून खून केल्याचे सांगत होता. शिवाय काशिनाथ त्यांच्या चुलत्यालाही ठार मारल्याचे सांगितले.

हा प्रकार दाक्षिणात्य फिल्मस्टाईला होता. यानंतर तो इस्पुर्ली पोलीस ठाण्यात हजर झाला. याची दखल घेऊन तातडीने करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर हे फौजफाट्यासह येऊन पंचनामा केला. त्यानंतर उपअधीक्षक प्रशांत अमृतकर यांनीही या घटनेची दखल घेतली व पुढील तपास सुरू केला आहे. काशिनाथ याचा तीन वर्षांपूर्वीच विवाह झाला आहे. त्याला एक वर्षाची मुलगी आहे. त्याच्या मागे आई-वडील भाऊ असा परिवार आहे. तर किरण हा अविवाहित तरुण आहे. या घटनेमुळे परिसर हादरला आहे.

आज सकाळीच काशिनाथच्या कौलव येथील आजोळच्या आजोबांचे निधन झाल्याने आई-वडील तिकडे गेले होते. आईवर वडिलांच्या दुःखाचा डोंगर कोसळला असतानाच तासाभरात मुलग्याचा खून झाल्याची बातमी समजल्यानंतर त्या दोघांवर आभाळ कोसळले.

 आठ दिवसांपूर्वीच करवीर पोलिस ठाण्यात काशिनाथने आपल्याला किरण धमकी देतो, शिवीगाळ करतो. माझ्या जीवितास धोका आहे. अशी तक्रार नोंदवली होती. आज घटनास्थळी मृताच्या नातेवाइकांनी याबाबत पोलिसांना धारेवर धरले. याविषयी श्री. अमृतकर यांना विचारले असता या प्रकरणाचा तपास करू असे सांगितले.  ही तक्रार पोलीसांनी गांभीर्याने घेतली असती तर आज हे घडले नसते ही येथे चर्चा होती.
 

 खून केल्यानंतर आरोपी हातात कोयता घेऊनच मुख्य रस्त्याच्या चौकात आला आणि तोडला खून केला असे ओरडत होता. शिवाय गावात जाऊन किशोरच्या  चुलत्यानाही काश्याला तोडला असे सांगून दहशत माजवत होता. असेही लोकांनी सांगीतले.

संपादन - अर्चना बनगे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT