keeping covid waste open fined  Rs 5,000 for  Surya Hospital
keeping covid waste open fined Rs 5,000 for Surya Hospital 
कोल्हापूर

निष्काळजीपणा नडला ; कोल्हापुरातील 'या' हॉस्पिटलवर दंडात्मक कारवाई  

निवास चौगले

कोल्हापूर : कोव्हिड कचरा (बायोमेडिकल वेस्ट ) रस्त्यावर उघडयावर ठेवल्याबददल महापालिकेच्या पथकाने येथील सुर्या हॉस्पिटलवर पाच हजार रुपयांच्या दंडाची कारवाई  केली आहे.
 येथील सुर्या हॉस्पिटलने कोव्हिड कचरा (बायोमेडिकल वेस्ट ) रस्त्यावर आणून उघडयावर ठेवला असल्याची ऑनलाईन  माहिती महापौर सौ. निलोफर आजरेकर यांना मिळाली, त्यानुसार महापौर सौ. निलोफर आजरेकर यांनी तात्काळ महानगरपालिकेच्या पथकाला पाहणी करुन कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ही कारवाई झाली. 

शहरातील सर्वच हॉस्पिटलनी त्यांच्याकडील कोव्हिड कचऱ्याची  (बायोमेडिकल वेस्ट ) योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्याची कार्यवाही करणे  बंधनकारक असतांना कोव्हिड कचऱ्यांच्या बाबतीत निष्काळजीपणा करुन कोव्हिड कचरा रस्त्यावर उघडयावर ठेवणे ही बाब अतिशय गंभीर असून यापुढे सर्वच हॉस्पिटलनी महाराष्ट प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहनही महापौर सौ. निलोफर आजरेकर यांनी केले आहे.


शहरातील व्यापाऱ्यांनी तसेच दुकानदारांनी  नेहमी मास्कचा वापर करण्याबरोबरच विना मास्क येणाऱ्या तसेच सोशल डिस्टन्सींगचा अवलंब न करणाऱ्या ग्राहकांना वस्तु देऊ नयेत, अशी सूचनाही महापौर सौ. निलोफर आजरेकर यांनी केली. तसेच सायंकाळी 7 नंतर व्यापाऱ्यांनी तसेच दुकानदारांनी  दुकान सुरु ठेऊ नये, अशी सूचनाही त्यांनी केली. शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरीकांनी नेहमी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिगचे पालन करणे, वारंवार हात साबनाने धुणे, कोठेही न थुंकणे यांची खबरदारी घेणे काळाची गरज असल्याचेही महापौर सौ. निलोफर आजरेकर यांनी स्पष्ट केले. 


संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : काँग्रेस सत्तेत आल्यास मोफत उपचार बंद होतील - पीएम मोदी

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT