Keshvrao Bhosale Theater history  esakal
कोल्हापूर

Keshvrao Bhosale Theater : काय आहे कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहाचे रोम साम्राज्याशी खास कनेक्शन? शाहू महाराजांची दूरदृष्टी

Keshvrao Bhosale Theater : पैलवानांच्या लाडक्या खासबाग मैदानाच्या शेजारीच शाहू महाराजांनी नाट्यगृह बांधलं, उभारणीची कहाणी

सकाळ डिजिटल टीम

 Keshvrao Bhosale Theater :  

राजर्षी शाहू महाराजांनी दिमाखात उभारलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली आहे. नाट्यगृहात सुरू असलेलं अग्नीतांडव पाहून प्रत्येक कोल्हापुरकर हळहळला आहे. सध्या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्नीशमन दल करत आहे.

उद्या म्हणजेच ९ ऑगस्ट रोजी नाट्यकलावंत गायक-अभिनेते केशवराव भोसले यांची जयंती आहे. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १८९० मध्ये झाला होता. या महान कलाकाराच्या जयंतीच्या पुर्वसंधेला ही घटना घडल्याने आश्चर्यही व्यक्त केलं जात आहे. कोल्हापुरात हे नाट्यगृह कसं उभं राहीलं, त्याचा इतिहास काय आहे जाणून घेऊयात.

कोल्हापुरला नाट्यपंढरी असेही म्हणतात. याच कारण आहेत राजर्षी शाहू महाराज. कारण, कोल्हापुरात नाटकं व्हावीत, कलाकार निर्माण व्हावे यासाठी 'पॅलेस थिएटर' असे ठेवले होते. कालांतराने त्याचे नाव केशवराव भोसले नाट्यगृह असे ठेवण्यात आले.

राजर्षी शाहू महाराजांनी नाट्यकलेला वाव दिल्यानंतर 'नाट्यकला' निरंतर विकसित व प्रफुल्लित होऊ लागली. १९०२ साली महाराज बादशहाच्या राज्यारोहणासाठी इंग्लंडला गेले होते. त्या वेळी त्यांनी रोमला पण भेट दिली होती. तिथून आल्यानंतर कोल्हापूरला कुस्त्यांचे जंगी मैदान 'खासबाग मैदान' बांधून काढल्यानंतर नाट्यविकासासाठी एक नाट्यगृहदेखील बांधण्याची त्यांनी योजना आखली होती.

जीवबा कृष्णाजी चव्हाण या ओव्हरसियरकडून आपल्या कल्पनेप्रमाणे त्यांनी नाट्यगृहासाठी एक तंत्रशुद्ध आराखडा बनवून घेतला, बाळकृष्ण गणेश पंडित यांना नाट्यगृह बांधण्याचे काम देऊन खासबाग मैदान या कुस्ती मैदानाशेजारीच नाट्यगृहाचे काम सुरू केले. कुस्ती जशी मैदानात कोठेही बसली तरी दिसते. त्याप्रमाणे रंगमंचावरील नाट्य प्रेक्षकांना कोठूनही दिसावे, अशी रचना महाराजांनी स्वतः जातीने उभे राहून करवून घेतली.

कलाकाराचा आवाज सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी महाराजांनी केली ही युक्ती

केशवराव भोसले नाट्यगृहाच्या रंगमंचाखाली एक खोल खड्डा आहे. छोटी विहीरच आहे असे म्हटले जाते. ही विहीर खोदण्यामागे कलाकारांचा आवाज आहे त्या अवस्थेत, शेवटच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचला जावा, तो फुटू नये म्हणून विशेष दक्षता घेऊन रंगमंचाखाली मोकळी व पाण्याची जागा खास ठेवण्यात आली.

या नाट्यगृहाचे बांधकाम पूर्ण व्हावयास तीन वर्षे लागली. यालाच 'पॅलेस थिएटर' असे नाव ठेवण्यात आले. पुढे हे नाव बदलून आज 'केशवराव भोसले नाट्यगृह' असे संबोधले जाते. नाट्यगृहाच्या बांधकामास ९-१०-१९१३ रोजी सुरवात झाली होती. तर काम पूर्णत्वास येण्यास १४-१०-१९१५ रोजीचा दिवस उजाडला. पॅलेस थिएटरचे उद्घाटन त्यावेळचे कोल्हापूर संस्थानचे युवराज श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज यांचे हस्ते झाले.

(संबंधीत माहिती प्रा.नानासाहेब साळुंखे यांच्या 'शाहूंच्या आठवणी' या पुस्तकातील 'महाराजांनी दिलेलेल असेही वन्समोअर' या लेखातून घेण्यात आली आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT