राहूल शिवठणकर sakal News
कोल्हापूर

Kolhapur : मलिकवाड येथील 'त्या' युवकाचा मृतदेह तीन दिवसांनी सापडला

एसडीआरएफ पथकाला यश; मृतदेह पाहताच कुटुंबीयांचा हंबरडा

सकाळ वृत्तसेवा

मलिकवाड : खानापूर तालुक्यातील हारूरी गावातील युवक बुधवारी (ता. 6) बाराच्या दरम्यान मलिकवाड दुधगंगेत बुडाल्याची घटना घडली होती. राहुल बळीराम शिवठणकर (वय 26) याचा गेले तीन दिवस एसडीआरएफ पथक, सदलगा पोलिस व अग्निशमन दलाचे कर्मचारी यांनी शोध घेत होते. अखेर आज शुक्रवारी (ता. 8) सकाळी दानवाड नदीकाठावर राहुलला शोधण्यास यश आले. मृतदेह पाहताच त्याच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.

राहुल गेल्या चार दिवसापूर्वी दत्तवाड येथे आपले काका अनंत शिवठणकर यांच्याकडे आला होता. त्यांनी चंदुर (ता. चिक्कोडी) येथे काम घेतले होते. बुधवारी अमावस्या असल्याने काम बंद ठेवले होते. त्या दिवशी तो दसऱ्यानिमित्त अंथरूण धुण्यास आपल्या काका सोबत आला होता. काका धुतलेले अंथरूण ठेवण्यास परत गेले होते. राहुल हा पोहत असताना पुलापलीकडे भोवर्‍यात पडल्याने पाण्यात बुडाला होता.

सदलगा पोलिस, अग्निशमन दलाचे जवान व एसडीआरएफ पथक शोध घेत होते.

तिसर्‍या दिवशी राहुलला शोधण्यास एसडीआरएफ पथकला यश आले. दानवाड येथे घटनास्थळी चिक्कोडी तालुका आरोग्याकारी डॉ. व्ही. व्ही. शिंदे, एएसआय एस. एम. सनदी, एन. बी. अक्कोळे, महेश कोरवी, एस. एल. होगार व पोलिस कर्मचारी यांनी पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद सदलगा पोलिस ठाण्यात झाली आहे.

-अजित सुतार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT