उचगाव (कोल्हापूर) : प्रथमदर्शनी तुम्हाला ही शमीची वनस्पती आहे, असे वाटेल; कारण, या वनस्पतीची पाने शमीसारखे दिसतात; पण तुम्ही साफ फसला. ही शमी नव्हे; तर ही आहे, वेडी बाभूळ. अमेरिकेतील काही उष्ण कटिबंधातील भागातून खूप वर्षांपूर्वी भारतात आली अन् इथल्या मातीत रुजली. मुळ बाभळीपेक्षा गतीने वाढणारी ही वेडी बाभूळ आता कोल्हापूर परिसरातही पाय पसरत आहे.
लोणार वसाहतीत रेल्वे ट्रॅकच्या बाजूला वेडी बाभळीची दोन झाडे दिसतील. ही वेडी बाभूळ कुठल्यातरी मार्गाने परिसरात आली असली तरी ती गतीने पसरु शकेल. यासाठी वेड्या बाभळीचे तातडीने नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
ज्यांनी मिरज, कवठेमहांकाळ, सोलापूर, साताऱ्यातील काही भाग, मराठवाडा आदी कमी पावसाळी प्रदेशात ज्या पद्धतीने वेडी बाभूळ पसरलेली पाहिली आहे. त्यांना ती कशी वेड्यासारखे पसरते ते समजू शकेल.
हातकणंगले, कुरुंदवाड, इचलकरंजीतील काही पट्ट्यात दिसते. जिथे ती उगवते, तिथे अन्य वनस्पती उगवत नाहीत. शुष्क प्रदेश, कमी पाऊस, जास्त तापमान, खडकाळ जागा, रेताड जमीन, जिथे काही उगवत नाही, अशा ठिकाणात ती तग धरते. तिला टोकदार काटे असतात. लोणार वसाहतीत रेल्वे ट्रॅकच्या बाजूला ती उगवली असून, बियांपासून प्रसार झाला असावा.
रेल्वे ट्रॅकच्या बाजूला फाऊंड्री सॅंड, कोळशाचे तुकडे, प्लास्टिक, अन्य कचरा, अन्य टाकाऊ वस्तू, तुंबलेले सांडपाणी आहे अशा स्थितीत ती उगवली आहे. शिरोली एमआयडीसी, गोकुळ शिरगाव भागात फाऊंड्री सॅंड, कोळशाची भुकटी कुठेही टाकलेली दिसते. जिथे हा कचरा टकाला जातो, तिथे अन्य वनस्पती येत नाहीत तिथे अशा वेडा बाभळी उगवतात
उपयोग कशासाठी?
कोवळ्या फांद्या शेळ्या-मेंढ्यांना खाऊ घालतात. वनस्पतीचे सर्व भाग ज्वरनाशक, पाने स्वेदकारी असतात. बियात अल्ब्युमीन, ग्लुटेलीन प्रथिने असतात. तसेच बियांपासून सोनेरी रंगाचे स्थिर तेल मिळते. लाकूड पांढरट ते जांभळट तपकिरी, कठीण, जड असते. लाकडाचा जळण, कोळसा बनविण्यासाठी वापरत होतो. सालीपासून पांढरा, आखूड पण ठिसूळ धागा मिळतो. वेड्या बाभळीचा उपयोग कागद निर्मितीसाठी करतात.
"पश्चिमेकडील अतिपावसाळी प्रदेशात वेडी बाभूळ दिसत नाही. जिथे शुष्क प्रदेश आहे, तिथे ती दिसते. कोल्हापूर परिसरात काही ठिकाणी ही वेडी बाभूळ पाहिली आहे. ही परदेशी वनस्पती आहे."
- प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर, वनस्पती संशोधक
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.