कोल्हापूर

ठाकरे सरकारकडे घोटाळे करण्याच्या वेगवेगळ्या कला - सोमय्या

सकाळ वृत्तसेवा

ठाकरे सरकारच्या अशा अनेक घोटाळे करण्याच्या कला अमर्यादित आहेत.

कोल्हापूर - ठाकरे सरकारकडे घोटाळे करण्याच्या वेगवेगळ्या कला आहेत. घोटाळे करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) दरवेळी वेगळी कला शोधून काढतता, ही कला प्रत्येकवेळी डेव्हलप केली जाते, घोटाळे करायचे पण वेगवेगळ्या पद्धतीने करायचे, असा हल्लाबोल भाजपाचे किरीट सोमय्या यांनी (kirit Somaiya) केला आहे. आज ते कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी त्यांनी मश्रीफांच्या (Hasan Mushrif) घोटाळ्यासंदर्भात भाष्य केले. ते म्हणाले, मागेच मी एक गोष्ट सांगितली होते, मश्रीफांच्या मुलाच्या खात्यात जी कंपनी बंद झाली अशा कंपनीच्या नावाने बँक अकाउंट उघडले गेले आहे. त्याचे पैसेही त्यांच्या मुलाच्या हातात आले आहेत. याशिवाय त्यांनी स्वतःच्या ग्रामविकास खात्याचे टेंडर स्वतःच्याच जावयाच्या कंपनीला दिले आहे. ठाकरे सरकारच्या अशा अनेक घोटाळे करण्याच्या कला अमर्यादित आहेत. जी कंपनी अस्तित्वातच नाही त्या कंपनीतून पैसे आले कसे असा सवाल ही त्यांनी केला आहे. दरवेळी ते वेगवेगळ्या कला शोधून काढतात. घोटाळ्यांबाबत मुरगुड येथील पोलिस अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत कायदेशीर पुरावे दिले आहेत. बाकीचेही देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताचा किरकोळ महागाई दर वाढला! सलग तिसऱ्या महिन्यात किंमती वाढलेल्याच, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर काय?

VAIBHAV SOORYAVANSHI: संजू सॅमसन की वैभव सूर्यवंशी? दुसऱ्या टी-२०आधी टीम इंडियासमोर मोठा सवाल; ‘या’ समस्येचाही शोधावा लागणार उपाय

Vastu Tips: घरात मांजर पाळताय? मांजर पाळण्यापूर्वी जाणून घ्या वास्तुचे 'हे' नियम; नाहीतर वाढेल नकारात्मक ऊर्जा!

Interesting Money Story: कुत्र्याला फिरवायला गेले अन् नशीबच पालटलं! ना लॉटरी, ना वारसा... एका क्षणात झाले करोडपती; नेमकं काय घडलं?

अंकिता वालावलकरने गणेशोत्सवादिवशीच दिली गुडन्यूज, मुंबईत घेतलं स्वतःचं घर; कुठे आहे तिचा २ बीएचके? म्हणते- सध्या इंटेरिअर...

SCROLL FOR NEXT