Kirnotsav from today at Ambabai temple kolhapur 
कोल्हापूर

अंबाबाई मंदिरात आजपासून किरणोत्सव; पाच दिवस होणार किरणांचा अभ्यास

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर भाविकांना दर्शनासाठी अद्यापही बंदच आहे. मात्र, परंपरेप्रमाणे होणारा किरणोत्सवाचा सोहळा आज (ता. ८) पासून होणार असून, सलग पाच दिवस किरणांचा अभ्यास केला जाणार आहे. 


दरम्यान, देवस्थान समिती व विवेकानंद कॉलेजचे प्रा. मिलिंद कारंजकर आणि टीमने कालपासूनच मावळतीच्या सूर्यकिरणांची पाहणी सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी मावळतीची सूर्यकिरणे देवीचा चरणस्पर्श करतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 


मंदिरात वर्षातून दोन वेळा किरणोत्सवाचा सोहळा होतो. पूर्वी तीन दिवसांचा असणारा हा सोहळा अलीकडच्या काळात पाच दिवसांचा असल्याचे स्पष्ट करून देवस्थान समितीने गेल्या वर्षीपासून पाच दिवसांचा सोहळा जाहीर केला. त्यानुसार आता सलग पाच दिवस हा सोहळा होईल. मात्र, मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election: महायुतीत जागावाटपावरून तणाव! ‘नो कॉम्प्रोमाइज’ मोडमध्ये शिंदेसेना; ७ जागांसाठी आक्रमक भूमिका घेत भाजपवर दबाव

SRH vs RCB Live: विराट कोहलीच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड! गतविजेत्यांनी मोठा डाव टाकला अन् किंग कोहली जगात 'सुपर डुपर' ठरला

NEET Paper Leak प्रकरणात मोठा खुलासा! भौतिकशास्त्राचा पेपर लीक करणारी मुख्य सूत्रधार मनिषा हवालदार; कसा आखला डाव?

Hasan Mushrif Sharad Pawar : हसन मुश्रीफांनी संपलेला विषय पुन्हा काढला, "शरद पवारांना आमदार प्रेमापोटी भेटले असतील"; संजय शिरसाठांवरही केलं भाष्य

Mumbai Health Alert: साखर कमी खाल्ली तरी मधुमेह का होतो? मुंबईतील वाढत्या केसेसमागचं विज्ञान आणि जीवनशैलीतील धक्कादायक कारणं

SCROLL FOR NEXT