Kitchen Garden In The Yard Of The House Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

लॉकडाउनमधील वेळ लावला सत्कारणी...घराच्या आवारात साकारले किचन गार्डन

अशोक तोरस्कर

उत्तूर : येथील पंचशील कॉलनीतील सुनीता सुहास पाटील यांनी आपल्या घराच्या आवारात किचन गार्डन साकारले आहे. कोरोनाच्या काळातील वेळेचा उपयोग त्यांनी यासाठी केला. पाटील याना वृक्ष संवर्धनाची आवड आहे. त्यानी व्हरांडयात, गच्चीवर, फुलझाडे, फळभाज्यांची लागवड केली आहे. त्यांनी लावलेला भोपळा, दोडका या वेलींची चांगली वाढ झाली आहे. दैनंदिन जेवनासाठी लागणारा भाजीपाला यातून मिळत आहे. 

लॉकडाऊनच्या काळात पालेभाज्या, फळभाज्या मिळणे कठीण झाले होते. पाटील यांनी या स्थितीवर मात करण्यासाठी इमारतीच्या टेरेसवर रिकामे लाल भोपळा, दोडका, श्रावण घेवडा, पावटे, काकडीचे बी जून महिन्यात लावले. त्याचे वेल आता वाढले आहेत. वेलींना आधारासाठी गुढीच्या वापरलेल्या काठ्या, नारळीच्या झावळ्यांच्या काड्या यांचा वापर केला आहे. भाजीची बाजारपेठ विविध कारणांनी बंद असली आपण तयार केलेल्या भाज्या टेरेसवरून काढून ताजे पदार्थ बनवता येतात. 

किचन गार्डनची आणखी एक उपयोग म्हणजे तरूण-तरूणी लॉकडाऊनच्या काळात निराशेने ग्रस्त न होता टेरेस गार्डनमध्ये मन रमवू शकतात. शहरी परिसरात शेती नसलेने महिलांनी टेरेसवर पालेभाज्या, फळभाज्या लावल्यास वेळ व पैशांची बचत होवून रिकामा वेळ सत्कारणी लागतो, असे पाटील यांचे म्हणने आहे. 
सुरवातीला त्यांनी बाजारातून रिकाम्या कुंड्या व झाडे विकत आणली. मात्र झाडापेक्षा कुंड्या महाग असल्याचे त्यांना जाणवले. यामुळे त्यानी टाकावू वस्तूंपासून कुंड्या तयार करण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी गोडे तेलाचे रिकामे डब्बे, प्लास्टीक कॅन, टब, रंगाचे डबे, प्लास्टिकच्या बरण्यांचा वापर केला. यामध्ये माती व शेणखत भरुन घेतले. पारंपरिक बियाणे आनून त्यामध्ये बियाणे रुजवले. कोरोनाच्या काळात भरपूर वेळ असलेने त्यांची चांगली देखभाल केली. 

स्वयंपाकासाठी लागणाऱ्या पालेभाज्या, कंद, शेंगा, वेली, फळझाडे त्यांनी आपल्या परिसरात लावल्या आहेत. फळझांडामध्ये आंबा, नारळ, लिंबू, कढीलिंब ही झाडे वाढवली आहेत. फळभाज्यांमध्ये टोमॅटो, वांगी, भेंडी, मिर्ची. कंद भाज्यांमध्ये मुळा, बटाटे, कांदे. पालेभाज्यांमध्ये मेथी, अंबाडी, चवळी, पालक, चाकवत, आंबटचुका, माठ, शेपू या भाज्या लावल्या आहेत. शेंगांमध्ये गवार, मटार, चवळी, वालाच्या शेंगा, वेलीच्या भाज्यांमध्ये लाल भोपळा, दुधी, कारली, हिरवी मिरची, आले, कोथिंबीर, यापैकी जमतील तेवढया जास्तीत जास्त भाज्या त्यांनी लावल्या आहेत. 

बागेच्या छंदातून आरोग्याचे रक्षण
आपण पालेभाज्या, फळभाज्या, लावल्या व त्याचे संगोपन केले, तर दैनंदिन जेवनासाठी आवश्‍यक असलेला भाजीपाला घरीच उपलब्ध होतो. बागेच्या छंदातून आरोग्याचेही रक्षण होते. वेळ सत्कारणी लागल्याचा आनंदही मिळतो. 
- शिवाजी गडकरी, कृषी सहाय्यक, उत्तूर 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Latest Maharashtra News Updates : मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास करताना म्हाडाला बांधकाम करून मिळणार

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

SCROLL FOR NEXT