Karveernivasini Shri Ambabai  
कोल्हापूर

Kolhapur : श्री अंबाबाईसाठी ४७ तोळ्यांचा किरीट; किंमत तब्बल २४ लाख रुपये

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईसाठी एका भाविकाने ४७ तोळे वजनाचा सोन्याचा किरीट अर्पण केल्याची माहिती मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी दिली.

जालना येथील एका ट्रस्टच्या माध्यमातून हा किरीट देवीच्या चरणी अर्पण करण्यात आला आणि त्यानंतर मंदिर व्यवस्थापनाकडे तो सुपूर्द केला आहे. बाजारभावानुसार या किरीटाची किंमत २४ लाख रुपये आहे.

श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी गेल्या काही वर्षात भाविकांची संख्या वाढली आहे. यंदाच्या हंगामात तर ही संख्या सर्वाधिक आहे. त्याचबरोबरच देवीला विविध अलंकार अर्पण करणाऱ्या भाविकांचेही प्रमाण वाढले आहे. कोणत्याही नाव आणि प्रसिद्धीशिवाय श्रद्धेने अनेक भाविक देवीला अलंकार अर्पण करतात. मात्र, त्याची नोंद करून रितसर पावती संबंधित भाविकांना दिली जाते.

कऱ्हाड येथील एका भाविकाने दोन दिवसांपूर्वी पाच तोळ्याचा सोन्याचा हारही देवीच्या चरणी अर्पण केला असल्याचेही दिंडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅबिनेटमध्ये मोदी इन्स्टाग्रामवर लक्ष द्यायला सांगतात, राजीनाम्यानंतर प्रधानांचं स्वागत; हेच का पेपरफुटीवर गांभीर्य? गोगोईंचा सवाल

नागपुरात मुसळधार! शाळा पाण्यात, रस्त्याचं काम वेळेत पूर्ण न झाल्याचा फटका; पाणीच पाणी

Mumbai Local: मुंबई लोकलला प्रवाशांमुळे उशीर, रेल्वे प्रशासनाचा दावा; नेमकं प्रकरण काय?

Latest Live Updates Marathi : 'पेपरफुटी हा आता पॅटर्न झालाय', अभिषेक बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Guru Purnima: गुरुपौर्णिमेनिमित्त आवर्जून भेट द्यावी अशी भारतातील पवित्र ठिकाणे!

SCROLL FOR NEXT