kolhapur aam aadmi party protest against electric bill 
कोल्हापूर

मी लाईट बिल भरणार नाही; तुम्हीपण भरू नका ; 'आप'तर्फे विज बिलांविरोधात मोहीम 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : एप्रिल महिन्यापासूनचे वाढीव वीजदर मागे घ्यावेत. लॉकडाउन काळातील दर महिना 200 युनिट वीजबिल माफ करावे, अशी मागणी आम आदमी पार्टीने विविध आंदोलनांच्या माध्यमातून केली होती; परंतु राज्य शासनाने यावर अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून "मी लाईटबिल भरणार नाही; तुम्हीपण भरू नका', अशा आशयाचे स्टिकर्स लावण्याची मोहीम आम आदमी पार्टीने सुरू केली आहे. 

मोहिमेद्वारे शहरातील सर्व 81 प्रभागात स्टिकर्स लावले जात आहेत. या माध्यमातून पार्टीने मिस्ड कॉल नंबर जाहीर करून पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. "आप'च्या वतीने वीज दरवाढीचा मुद्दा सातत्याने लावून धरला गेला आहे. निवेदने, विजबिलांची होळी, धरणे आंदोलन, मिस्ड कॉल मोहीम, पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या, महावितरणला टाळेठोक असे आंदोलनाचे टप्पे पूर्ण होऊन देखील राज्य सरकारने नागरिकांच्या रोषाची दखल घेतली गेलेली नाही.

27 तारखेला होणाऱ्या सर्वपक्षीय टाळेठोक आंदोलनात "आप' सामील होणार असून पार्टीतर्फे नागरिकांना धीर देण्याच्या हेतूने ही मोहीम राबवत असल्याचे 'आप'चे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, उत्तम पाटील यांनी सांगितले. 


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diesel Rate: मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! आता डिझेल प्रति लिटर ५ रुपयांनी स्वस्त मिळणार; पण कुणाला? जाणून घ्या...

Numerology : 'या' 5 मूलांकाचे लोक असतात सगळ्यांत जास्त निगरगट्ट; त्यांच्यासाठी कितीही चांगलं करा शेवटी तुम्हाला देतात धोका

Helmet Expiry Check: तुमचं हेल्मेट एक्सपायर झालंय? घरबसल्या ‘या’ ट्रिक्सने लगेच करा चेक

IPL 2026 Marathi News: श्रीलंकेच्या ३ खेळाडूंना मिळाली NOC! पथिरानासह ४ खेळाडू लटकले; RCB, KKR सह इतरांचे टेंशन वाढले

महाराष्ट्राचे पोलिस आरोपीला पकडायला यूपीमध्ये पोहोचले, लोकांनी त्यांनाच चोर समजून चोपले; एका गोष्टीमुळे झाली गडबड

SCROLL FOR NEXT