कोल्हापूर

Kolhapur Accident: कोल्हापुरातील रस्त्यावर घडला 'कॅरम बोर्ड'सारखा थरार! भरधाव कारनं दुचाकींना उडवलं, तिघांचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

यामध्ये भरधाव वेगात असलेल्या एका कारनं सायबर चौकात चार ते पाच दुचाकींना जोरदार धडक दिली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

कोल्हापूर : पुण्यातील पोर्शे या आलिशान भरधाव कारनं दोघांचा जीव घेतल्याच्या अपघातानं देशाला हादरवून टाकलेलं असतानाच आता कोल्हापुरातील एक भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये भरधाव वेगात असलेल्या एका कारनं सायबर चौकात चार ते पाच दुचाकींना जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की त्यामुळं धडक दिलेल्या दुचाकी उडून इतर दुचाकींना धडकल्या त्यावरील लोकही 'कॅरम बोर्ड' फोडल्याप्रमाणं उडाली. या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. (Kolhapur accident thrill like carrom board happened on Kolhapur road rash car dash many two wheelers)

सुत्रांच्या माहितीनुसार, कोल्हापुरातील सायबर चौकात हा भीषण अपघात झाला आहे. नेहमीप्रमाणं या चौकात वाहतूक सुरु असताना अचानक एक भरधाव कारनं राजारामपुरीकडून येताना बरोबर चौकामध्येच एकमेकांना क्रॉस होणाऱ्या काही दुचाकींना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की कॅरम बोर्डवरील सोंगट्या स्टायकरनं फोडल्यानंतर ज्या पद्धतीनं कॅऱम फुटतो तशी दुचाकीवरील लोक उडाले. या धडकेची तीव्रता सांगताना पहिल्यांदा ज्या दुचाकीस्वारांना धडक बसली त्यावरील लोक दुसऱ्या दुचाकीवर जाऊन धडकले, अशा प्रकारची ही दृश्ये पाहून थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.

या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार ते पाच जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळतेय. यांपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर सीपीआर आणि सिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजारामपुरी आणि शिवाजी विद्यापीठ तसंच राजाराम कॉलेजला जोडणारा हा सायबर चौक असून या चौकात मोठी गर्दी असते. या चौकाच्या बाजूला अनेक शाळा आणि सायबर कॉलेजही आहे.

७२ वर्षीय कार चालकाचाही मृत्यू

पोलिसांच्या माहितीनुसार, हर्षद सचिन पाटील (वय १६ रा. कोल्हापूर) आणि एक १९ वर्षाचा तरुण (नाव कन्फर्म नाही) आणि धडक दिलेल्या कारचे चालक वसंत चव्हाण (वय ७२) अशी मृत्यू झालेल्या तिघांची नाव आहेत. यांपैकी वसंत चव्हाण हे शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरु होते. चव्हाण यांना भोवळ आल्यानं त्याचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. चव्हाण यांना काही आजार होता का? याची माहिती पोलीस त्यांच्या कुटुंबीयांकडून घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरच्या फिंगरप्रिंट बघायच्या आहेत : राज ठाकरे

Ahilyadevi Holkar Loan Waiver : कर्जमाफी अन् 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान! 41 हजार 552 शेतकऱ्यांचे खाते होणार नील; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

KDMC: परवानगी १४ मजल्यांची, बांधले २१ इमले; सात मजले बेकायदा, बिल्डरसह केडीएमसी अधिकाऱ्यांचे धक्कादायक कारनामे

Koyna Dam Water Release : कोयना धरणाचे सहा दरवाजे ६ फूटांनी उचलले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; ३३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

Ratnagiri Tourism : मिनी महाबळेश्वर' माचाळमधील प्रसिद्ध 'भिषाचा कडा' बनतोय धोकादायक! 'उलट्या धबधब्यावर' पर्यटकांचा जीव धोक्यात; तातडीने सुरक्षा भिंत उभारण्याची मागणी

SCROLL FOR NEXT