kolhapur administration pressure on asha workers 
कोल्हापूर

स्वत:च्या डोळ्यासमोर कोणाचा बाप, कोणाची आई, कोणाच्या मुलीचा मृत्यू होत होता पण....   

सदानंद पाटील

कोल्हापूर - कोरोनाच्या रुग्णांबाबत येत असणारे अनुभव सांगितले म्हणून काही कर्मचाऱ्यांना दमदाटी करण्याचा धक्‍कादायक प्रकार पुढे आला आहे. महत्वाचे म्हणजे ही तंबी कोणी राजकीय व्यक्‍ती वा गुंडापुंडांनी दिली नसून ती प्रशासनातील व्यक्‍तींनी दिली आहे, हे विशेष. कोरोनामधील अपयश लपवण्यासाठी व खरी माहिती पुढे येवू नये म्हणूनच असा प्रकार होत असल्याची चर्चा आता जोर धरु लागली आहे. 

कळंबा येथील एक रुग्ण बेड न मिळाल्याने अत्यवस्थ झाला. त्याला शहरातील शासकीय व खाजगी हॉस्पीटलमध्ये फिरवण्यात आले. मात्र एकाही ठिकाणी बेड मिळाला नाही. पाच तासाची अयशस्वीस झुंज दिल्यानंतर हा रुग्ण काही कर्मचाऱ्यांच्या डोळ्यासमोर दगावला. स्वत:च्या डोळ्यासमोर कोणाचा बाप, कोणाची आई, कोणाची मुलगी कोणाची नातवंडे मृत्यू पावत असताना आपण काही करु शकत नसल्याचे शल्य या कर्मचाऱ्यांना वाटत होते. त्यांनी या भावना व्यक्‍त केल्या म्हणून प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांना त्याचा राग आला. त्यातूनच त्यांनी अशा कर्मचाऱ्यांवर रोष व्यक्‍त करण्यास सुरुवात केली आहे. तुम्हाला रुग्णांचा कळवळा कशासाठी, एकच व्यक्‍ती अशी मेली आहे का, कामावर रहायचे आहे का, लेखी खुलासा करा असे प्रश्‍न अधिकारी विचारु लागले आहेत. एकूणच परिस्थिती हातबाहेर चालल्याने प्रशासन कसे अगतिक झालेस्वत:च्या डोळ्यासमोर कोणाचा बाप, कोणाची आई, कोणाची मुलगी कोणाची नातवंडे मृत्यू आहे, याचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. 

कोरोनाच्या रुग्णांपर्यंत व त्याच्या कुटुंबियांपर्यंत आरोग्य व अंगणवाडी यंत्रणेतील कर्मचारी पोहोचतात. त्यांच्याकडचे अनुभव थक्‍क करणारे आहेत. त्यांच्या अनुभवाचा विचार करुन प्रशासनाने धोरणात्मक निर्णय घेताना त्याचा वापर करणे आवश्‍यक आहे. मात्र असे होताना दिसत नाही. उलट अशी माहिती सांगणाऱ्या कर्मचाऱ्यांना तोंड मिटून गप्प बसा, असाच संदेश दिला जात आहे. कोरोनाचे नियोजन दिवसेंदिवस कोलमडत आहे. या कोलमडणाऱ्या नियोजनाचा व अपयशाचा राग खालच्या कर्मचाऱ्यांवर निघत आहे.  


 संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदी पत्रकारांच्या प्रश्नावर का बोलत नाहीत? भारतावर विश्वास का ठेवावा? पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिवांनी दिले सडेतोड उत्तर

Everest Base Camp Trek: २१० किलोमीटरचा खडतर हिमालयीन प्रवास; आळंदी-पिंपरी चिंचवडच्या डॉक्टरांचा साहसी पराक्रम, १६ दिवसांचा थरारक प्रवास पूर्ण..

Ajit Pawar NCP: महाराष्ट्रात नवा ‘राजकीय चाणक्य’ सक्रिय! अजित पवारांच्या पक्षात मोठे बदल, प्रशांत किशोर यांची पुण्यात एंट्री

Mumbai News: वांद्र्यात रेल्वेचा बुलडोझर! गरीबनगरातील अतिक्रमणांवर मोठी कारवाई; परिसरात तणावाचे वातावरण

Latest Marathi News Live Update : वांद्र्यात अतिक्रमावर बुलडोजर, पश्चिम रेल्वेची कारवाई

SCROLL FOR NEXT