Kolhapur Ahmedabad Airlines start today kolhapur marathi news 
कोल्हापूर

कोल्हापूर-अहमदाबाद  विमानसेवेस सुरू

सकाळ वृत्तसेवा

उजळाईवाडी  (कोल्हापूर) : कोल्हापूर ते अहमदाबाद या विमानसेवेची प्रतीक्षा आता संपणार असून उद्यापासून (ता. २२) सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस विमान सुरू होत आहे. कोरोनामुळे खंडित असलेली तिरुपती मार्गावरील विमानसेवाही उद्यापासून सुरू होत आहे. 


अनेक व्यापारी, व्यावसायिक, उद्योगासंबंधित व्यावसायिकांना कोल्हापूरहून अहमदाबाद, राजकोट, सुरत शहरांना जाण्यासाठी या सेवेचा फायदा होणार आहे. कोरोनामुळे तिरुपती देवस्थान बंद असल्याने भाविकांना वर्षभरापासून दर्शनापासून वंचित राहावे लागले होते.

आठवड्यातून तीन दिवस सेवा 

आता आठवडाभर विमानसेवा सुरू राहणार आहे. या दोन्ही मार्गांवर इंडिगो एअरलाईन्सची विमानसेवा आहे. कोल्हापूर-अहमदाबाद विमानफेरीसाठी ३५ प्रवासी जाणार असून प्रत्येकी ३,६०० रुपये तिकीट दर आहे. कोल्हापूर विमानतळावरून मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद, तिरुपती व बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळांवर विमानांचे संचालन होणार आहे. 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

SCROLL FOR NEXT