Kolhapur Ahmedabad flight to start tourism marathi news
Kolhapur Ahmedabad flight to start tourism marathi news 
कोल्हापूर

अहमदाबाद विमानसेवेला मिळाला ग्रीन सिग्नल ;  महिनाअखेरीस तिरुपती सेवाही सुरळीत

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : गतवर्षी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी कोल्हापूरसह महाराष्ट्रातील विविध विमानतळावरून नवीन सेवांच्या प्रश्‍नांवर चर्चेसाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉर्मसच्या हवाई वाहतूक समितीला निमंत्रित केले होते. त्यात कोल्हापूर-अहमदाबाद व कोल्हापूर दिल्ली मार्गावर सेवा सुरू करण्यास ग्रीन सिग्नल दिला होता. मात्र, कोरोनामुळे विमान सेवाच काही काळ बंद राहिली. त्यासह नवीन मार्गावरील सेवाही सुरू होऊ शकली नाही. 

खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी इंडिगोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून विमान सेवा सुरू करण्याबाबत हालचाली केल्या. माजी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडूनही सेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू राहिला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर विमान सेवा पुन्हा सुरू झाली. त्यामुळे महाराष्ट्र चेंबरनेही पुन्हा पाठपुरावा सुरू केला. इंडिगोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांना अडचणी दूर करण्यासाठी हस्तक्षेपाची लेखी विनंती केली. अखेर केंद्रीय मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर अडचणी दूर होऊन विमान सेवा सुरू होत आहे.

महिनाअखेरीस तिरुपती सेवाही सुरळीत

अखेर दीर्घकाळ प्रलंबित असलेली कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा २२ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. तांत्रिक अडचणी दूर झाल्याने ही सेवा सुरू होत असून, इंडिगो एअरलाईन्सच्या माध्यमातून आठवड्यातून तीन दिवस सेवा सुरू राहील. दरम्यान, कोरोनामुळे बंद असलेली तिरुपती-कोल्हापूर विमानसेवा २० किंवा २५ फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्‍यता आहे. 
कोल्हापूर विमानतळाचा विकास करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा सुरू करावी, या मागणीनेही जोर धरला होता.

विमानसेवा अशी...
अहमदाबादहून सकाळी आठला सुटलेले विमान सकाळी सव्वादहाला कोल्हापूरला पोचेल. पावणेअकराला कोल्हापुरातून अहमदाबादसाठी उड्डाण झाल्यावर ते एकला पोचेल. पहिल्या टप्प्यात सोमवार, बुधवार आणि शुक्रवार तीन दिवस सेवा सुरू राहणार आहे. बुकिंगचे एसएमएस आणि लिंक व्यापारी, उद्योजक, नागरिकांपर्यंत 
पोचली आहे.

विमानसेवा सुरू होण्यासाठी २०१७ पासून प्रयत्न करीत होतो. त्याला ८ एप्रिल २०१८ पासून सेवा सुरू होऊन यश आले. कोल्हापूरहून गुजरातमध्ये जाणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गुजरातमधून व्यवसाय व अंबाबाईच्या दर्शनासाठीही नागरिक येतात. याचा विचार करता ही विमानसेवा सुरू होत असल्याचा आनंद आहे. 
- धनंजय महाडिक, माजी खासदार 

कोल्हापूर-अहमदाबाद सेवा सुरू होणे आनंदाची बाब आहे. या प्रक्रियेत खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार प्रा. संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह विमानतळ संचालक कमलकुमार कटारिया, एअरपोर्ट ॲथोरिटी ऑफ इंडियाचे चेअरमन अरविंद सिंह यांचे विशेष सहकार्य मिळाले.’’ 
- ललित गांधी, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीचे हवाई वाहतूक समितीचे चेअरमन 

फाउंडेशनने अहमदाबाद विमान सुरू करण्याची मागणी केली होती. त्याला मूर्त स्वरूप आले असून, कोल्हापूरच्या व्यापार-उद्योग-पर्यटन वाढीसाठी उपयोग होईल.
- जयेश ओसवाल, अरिहंत जैन फाउंडेशन

संपादन- अर्चना बनगे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT