Kolhapur Airport
Kolhapur Airport sakal media
कोल्हापूर

Kolhapur Airport : ‘नाईट लँडिंग’चे काम प्रगतिपथावर

सकाळ वृत्तसेवा

उजळाईवाडी : कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंगसाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्याचे काम सुरू असून, याअंतर्गत १३७० मीटरच्या धावपट्टीवरील लाईट जोडणी पूर्ण झाली. नुकतीच त्याची चाचणी घेण्यात आली.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर धावपट्टीवरील रनवे लाईटच्या प्रकाशाने धावपट्टी उजळून निघाली. अद्याप ५७० मीटरच्या धावपट्टीवरील रनवे लाईटचे काम अपूर्ण आहे. हवाई वाहतुकीदरम्यान सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याने दिवसा असो वा रात्री धावपट्टीची दृश्यमानता स्पष्ट असणे आवश्यक असते.

दरम्यान तज्ज्ञांनी उच्च गुणवत्तेच्या रनवे लाईट्समुळे धावपट्टीची स्पष्ट दृश्यमानता (क्लियर व्हिजिबिलिटी) समाधानकारक असल्याचे निरीक्षण चाचणीत नोंदविले असून आणखी निरीक्षणे नोंदविण्यात घेणार असल्याचे समजते.

रनवे लाईटबरोबरच फ्लड लाईट, टॅक्सी वे लाईट, तसेच उंच अडथळ्यांवरील ऑब्स्टॅकल लाइट्स आदी वैशिष्टपूर्ण लाइट्स विमानतळावर व परिसरात बसवल्या आहेत. सर्व अडथळे दूर होऊन लवकरात लवकर नाईट लँडिंग सुविधा सुरू होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले. यासाठी स्थानिक मंत्री, खासदार, आमदार, प्रशासकीय अधिकारी यांच्यासह विमानतळ प्राधिकरणाचे कर्मचारी प्रयत्नशील आहेत.

आणखी काही अडथळे

नाईट लँडिंगसाठीचा प्रस्ताव डीजीसीएकडे पाठवला असून अजूनही काही अडथळे असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये उंच इमारती, वैभव हौसिंग सोसायटी, केआयटी, इंडो काउंट येथील अडथळे, उच्च दाबाच्या महावितरणचे मनोरे असे अडथळे दूर करण्याची सूचना केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: बारामतीच्या मतदानानंतर अजित पवार प्रचारातून गायब? शरद पवारांनी व्यक्त केली काळजी

Swati Maliwal News : दिल्लीच्या राजकारणात भूकंप! कुठे आहेत स्वाती मालीवाल? मारहाणीच्या मुद्द्यावरुन भाजपने 'आप'ला घेरलं

Latest Marathi News Live Update : मुंबई- अहमदाबाद मार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Rakhi Sawant Health Update: राखी सावंतला नेमकं काय झालंय? पूर्वाश्रमीच्या पतीनं दिली हेल्थ अपडेट

Astronomers: खगोलशास्त्रज्ञांनी 55 प्रकाशवर्षे दूर पृथ्वीच्या आकाराचा एक नवीन ग्रहाचा लावला शोध

SCROLL FOR NEXT