आजऱ्यात बांबूच्या कोमच्याची शेती  sakal
कोल्हापूर

आजऱ्यात बांबूच्या कोमच्याची शेती

बांबूच्या कोमच्याची आजरा तालुक्यात व्यावसाईक पद्धतीने लागवड करण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी सुमारे २० एकर क्षेत्रावर ही शेती केली जात असून हे कोमचे हॉटेल व अन्य उत्पादनसाठी पुरवठा केला जाणार आहे.

रणजित कालेकर

आजरा : बांबूच्या कोमच्याची आजरा तालुक्यात व्यावसाईक पद्धतीने लागवड करण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी सुमारे २० एकर क्षेत्रावर ही शेती केली जात असून हे कोमचे हॉटेल व अन्य उत्पादनसाठी पुरवठा केला जाणार आहे. शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधनही केले जात आहे.

तालुक्यात हिरण्यकेशी बांबू ग्रामविकास शेतकरी गट बांबूच्या व्यावयासायिक लागवड आणि प्रक्रिया उद्योग निर्मितीसाठी कार्यरत आहे. या गटातर्फे बांबू नर्सरी सुरू करण्यात आली आहे. या नर्सरीतून माणगा, मानवेल, बांबूसा बल्कोवा, बाबूसा टुल्डा, डॅन्ड्रोकॅल्मस ब्रॅाण्डसी, डॅन्ड्रोकॅल्मस अॅस्पर या जातींची लागवड तालुक्यात केली जात आहे. चीन, थायलंड, जपान, ब्रह्मदेश, श्रीलंका, अमेरिका, ब्राझील, मेक्सिको, कोलंबिया या देशात खाद्य पदार्थामध्ये बांबूच्या कोमच्यांचा वापर केला जातो. ईशान्येकडील राज्ये, दक्षिण भारतात व कोकणात बांबूच्या कोमच्यापासून विविध पदार्थ केले जातात. यामध्ये प्रामुख्याने कोमंच्याची भाजी, लोणचे, सूप, बांबू करी हे पदार्थ बनवले जातात.

मुंबईच्या दादर मार्केटसह, कोकणातील अनेक बाजारामध्ये बांबूचे कोमचे विकले जातात. एक किलोसाठी चाळीस ते ऐंशी रुपये दराने विक्री केली जाते. प्रक्रिया केलेले कोमचे तीनशे ते चारशे रुपये किलो दराने विक्री होते. आजरा तालुक्यात चाळीस वर्षांपूर्वी बांबूची कोमचे लोक आवडीने खातात. बांबूचे तांदूळ (बिया) ही खाल्ले जात होते. पण हे कालांतराने मागे पडले; पण आता मात्र याची मागणी जागतिक बाजारपेठेत वाढत चालली आहे. त्यामुळे हिरण्यकेशी बांबू ग्रामविकास शेतकरी गटाने विशेष लक्ष देऊन शेतकऱ्यांचे प्रबोधन व लागवडीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे यंदापासून बाबूच्या कोमच्या शेती सुरू केली आहे. सुमारे वीस एकर क्षेत्रात याची लागवड झाली आहे.

कोमचे म्हणजे काय?

दरवर्षी पावसाळ्याच्या सुरवातीला बांबू रुजून नवीन कोंब येतात. या कोवळ्या, मासल व मऊ कोंबाना कोमचे असे म्हटले जाते. हे कोमचे भाजीसह विविध खाद्य पदार्थांसाठी वापरले जातात. यामध्ये औषधी गुणधर्मासह न्युट्रियन्स, व्हीटॅमीन्स, मिनरल्स, फायबर आणि अॅन्टी ऑक्सीडेंन्ट असतात. तसेच फॅट व कॅलरी अत्यंत कमी प्रमाणात असतात. अनेक पोषक तत्त्‍वांनी युक्त असलेल्या बांबूच्या कोंबाना सुपर फूड असेही म्हटले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT