kolhapur
kolhapur esakal
कोल्हापूर

कोल्हापूर - मतदानाच्या सुरुवातीलाच निवृत्ती चौकात वादावादी

सुनील पाटील

कोल्हापूर : विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर मतदार संघातील पोटनिवडणूकीसाठी आज सकाळी 7 पासून मतदानाला सुरुवात झाली. दरम्यान, निवृत्ती चौकात भगवे छत लावण्यावरून पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. यावर पोलिसांनी भगवे छत न लावता केवळ बुथ लावाला जावा असे आवाहन केले आहे.

विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूकीसाठी कसबा बावडा, मुक्तसैनिक वसाहत, विचारे माळ, शिवाजीपेठ, कदमवाडी, जाधववाडी परिसरातील मतदान केंद्रावर मतदानासाठी गर्दी होत आहे. तर, इतर ठिकाणी मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी कमी दिसत आहे. तोरस्कर चौक येथे पोलिसांनी बुथवर भगव्या आणि हिरव्या रंगाचा उभारलेला तंबू काढण्यास कार्यकर्त्यांना भाग पाडले. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले. मंगळवारपेठ येथे भाजपा बुथ लावायचा नाही, अशी भूमिका घेत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना विरोध केला. त्यामुळे वातावरण तणाव पूर्ण झाले. पोलीसांनी यामध्ये हस्तक्षेप करुन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

नागाळापार्क, ताराबाई पार्क, ईस्टर पॅर्टन येथे मतदानासाठी अल्प प्रतिसाद मिळत आहे. उमेदवारांचे कार्यकर्ते या ठिकाणी लोकांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. जिल्हा प्रशासनाने मतदानासाठी दोन तास सुट्टी घेण्याची मुभा दिली आहे. याचा लाभ घेवून मतदान करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

आतापर्यंत ६.९६ टक्के मतदान

दरम्यान, आतापर्यंत ६.९६ टक्के मतदान झाले आहे. आज सकाळी ७ ते ९ पर्यंत २ लाख ९१ हजार ७९८ मतदारांपैकी १२१८७ पुरुष व ८१२४ महिला मतदारांनी मतदान केले. सकाळी ९ पर्यंत ६.९६ टक्के मतदान झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT