अधिक माहितीसाठी दिलेला क्यूआर कोड स्कॅन करा.
अधिक माहितीसाठी दिलेला क्यूआर कोड स्कॅन करा. sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : क्यूआर कोडद्वारे समजणार शेतमालाची अस्सलता

राजेश नागरे

कोल्हापूर : बाजारपेठेत देवगड हापूस लिहिलेल्या कागदी बॉक्समध्ये देवगड हापूसऐवजी कर्नाटकी आंबे घालून विक्री होते, कोल्हापुरी गुळाचे लेबल लावून प्रत्यक्ष कर्नाटकी गूळ विकला जातो. अशा हलक्या पण गुणवत्तापूर्ण शेतमाल म्हणून विक्री करीत ग्राहक व शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. त्याला आळा घालण्यासाठी पणन महामंडळाने आता पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांनी शेतमालाचा क्यूआरकोड करून तो शेतमालावर लावण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे ग्राहकांना दर्जेदार शेतमालाची खात्री करून मालाची खरेदी करता येणे शक्य होणार आहे.

अस्सल शेतीमालांची मागणी व खरेदी करणारा ग्राहक आहे. मात्र, काही विक्रेत्यांकडून निकृष्ट माल स्वस्तात खरेदी करून तोच माल स्वच्छ करून अथवा चांगल्या पॅकिंगमध्ये महागात विकला जातो. त्यामुळे अनेक ठिकाणांच्या अस्सल शेतीमालाची व ब्रॅण्डची बदनामी होते. कोल्हापुरातही आंबा किंवा गूळ उत्पादनाबाबत असे प्रकार घडतात. जे शेतकरी अस्सल व गुणवत्तापूर्ण शेती उत्पादन घेतात, तो ब्रॅंण्डेड, चांगला शेतमाल ग्राहकांना मिळावा, फसवणूक होऊ नये, चांगला दर मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी उत्पादनाचा क्यूआर कोड काढावा, याबाबत पणन महामंडळात जागृती घडवत आहे.

ग्राहकाने शेतमालावरील क्यूआर कोड स्कॅन केल्यास शेतकऱ्याचे नाव, फोटो, फोननंबर, उत्पादन घेतलेल्या ठिकाणांचा पत्ता, उत्पादनातील घटक, टिकाऊपणा, उत्पादन कालावधी, तसेच गुणवत्ता प्रमाणपत्र यापासून ते उत्पादन प्रक्रियेचा फोटो किंवा व्हिडिओ ग्राहकाला पाहता येईल. यातून अस्सल मालाची निवड करता येणेही शक्य होईल. ग्राहकाला एका क्लिकवर माहिती मिळणार आहे. क्यूआर कोड काढण्यासाठी पणन महामंडळ मार्गदर्शन करत आहे.

- सुभाष घुले, उपव्यवस्थापक, पणन महामंडळ

महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला जीआय मानांकन आहे. अशीच स्ट्रॉबेरी नाशिकसह अन्य जिल्ह्यातही पिकवली जाते. काही वेळा बाहेरच्या जिल्ह्याची स्ट्रॉबेरी महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी असल्याचे भासवून विक्री झाली. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी वाढल्या. यासाठी महाबळेश्वर स्ट्रॉबेरीचा क्यूआर कोड पॅकिंगवर घालण्यास सुरुवात केली. ग्राहकाला अस्सल स्ट्रॉबेरी मिळू लागली.

- गणपत पारटे, भिलार, जि. सातारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयूष चावलाच्या फिरकीची जादू चालली, हेडपाठोपाठ क्लासेनलाही केलं क्लिन-बोल्ड; हैदराबादचा निम्मा संघ गारद

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT