KolhapurBandh Hindu Organization esakal
कोल्हापूर

Kolhapur Bandh : कोल्हापुरात परिस्थिती नियंत्रणाबाहेर; आक्रमक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली तोडफोड

औरंगजेबच्या समर्थनाचा स्टेटस् ठेवल्याच्या प्रकरणावरून कोल्हापुरात मोठा तणाव निर्माण झालाय.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापुरातील परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेली आहे. शहरातील अनेक भागात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दगडफेक केली असून तणाव निर्माण झाला आहे.

Kolhapur Bandh : औरंगजेबच्या समर्थनाचा स्टेटस् ठेवल्याच्या प्रकरणावरून कोल्हापुरात मोठा तणाव निर्माण झालाय. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

हिंदुत्ववाद्यांनी काल कोल्हापूर बंदची हाक दिली होती. याला आज प्रतिसाद मिळताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून काही धर्मांधांकडून सोशल मीडियावरुन महापुरुषांची विटंबना सुरु आहे. लव्ह जिहादचे प्रकार वाढत आहेत, तरीही पोलीसांकडून ठोस अशी कारवाई होत नाहीये. त्यामुळं हे प्रकार वाढतच असल्याचं सांगत बंदच्या भूमिकेवर हिंदुत्ववादी संघटना ठाम आहेत.

आज सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं एकत्र येण्याचं आवाहन बैठकीदरम्यान करण्यात आलं. त्यानुसार हजारोंच्या संख्येनं हिंदुत्ववादी कार्यकर्ते चौकात जमले. पोलिसांनी आंदोलकांना शांत राहण्याचं, तसंच एकाच ठिकाणी आंदोलन करा अशी विनंती केली. मात्र, आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. सकाळपासूनच शहरात ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान, कोल्हापुरातील परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेली आहे. शहरातील अनेक भागात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दगडफेक केली असून तणाव निर्माण झाला आहे. कोल्हापूर महानगरपालिका चौकातील रिक्षा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी फोडली आणि उलटवली.

तर, चप्पल लाईनला असलेलं हॉलिऊड शूजचं दुकान देखील फोडलं. हिंदुत्ववादी कार्यकर्ते शहरभर पसरले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. जिल्हा बंदीचा आदेश झुगारून हजारो कार्यकर्ते कोल्हापूरच्या रस्त्यावर उतरले आहेत. मटण मार्केट परिसरात पोलिसांना लाटीचार्ज केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT