Kolhapur Bandh esakal
कोल्हापूर

Kolhapur : औरंगजेबच्या समर्थनार्थ पोस्ट; कोल्हापुरात तणाव, 'जय श्रीराम'चा नारा देत कडक कारवाईची मागणी

समाज माध्यमावर वादग्रस्त स्टेटस् ठेवल्यामुळं कोल्हापूर शहरात दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाला.

सकाळ डिजिटल टीम

औरंगजेबाच्या समर्थनाचा स्टेटस ठेवल्याच्या प्रकरणावरून लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर जमावानं सुमारे तीन तासांहून अधिक काळ घोषणाबाजी केली.

Kolhapur Bandh : समाज माध्यमावर वादग्रस्त स्टेटस् ठेवल्यामुळं कोल्हापूर शहरात दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाला, त्यामुळं हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं आज (बुधवार, ता. 7) कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे.

औरंगजेबाच्या समर्थनाचा स्टेटस ठेवल्याच्या प्रकरणावरून लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर जमावानं सुमारे तीन तासांहून अधिक काळ घोषणाबाजी केली. ‘जय श्रीराम’चा नारा देत या घटनेतील संशयितावर कडक कारवाई करावी, यासाठी आंदोलन केलं. संतप्त जमावातील काही तरुणांनी या परिसरातील दुकाने बंद पाडली.

बघता-बघता बिंदू चौक ते दसरा चौक, बिंदू चौक ते शिवाजी रोड, लुगडीओळ, कोंडाओळ, अकबर मोहल्ला तसेच सीपीआर चौक परिसरात तणाव निर्माण झाला. जमावाने लक्ष्मीपुरी बाजार येथे हातगाड्या उलटविल्या, काही दुकानांवर दगडफेक झाली. जमाव दुकाने बंद करत या परिसरातून फिरत होता. त्यामुळं काही काळ दुकाने बंद राहिली.

दुपारपासून लक्ष्मीपुरीत तणाव वाढत होता. चिमासाहेब चौकातील काही हातगाड्यांवरील साहित्य संतप्त जमावाने फेकून दिले. टाऊन हॉलमागील एका चिकन सेंटरची तोडफोड केली. संतप्त जमावाला रोखण्याचा प्रयत्न पोलिस करत होते. परंतु, जमाव तोडफोड करत सुटला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून शहरातील सर्व पोलिस फौजफाटा या परिसरात तैनात करण्यात आला.

रस्त्यावर शुकशुकाट

दुपारपासून लक्ष्मीपुरी परिसरात जमाव जमून आंदोलन करू लागल्यानंतर या परिसरात तणाव निर्माण झाला. दुकाने बंद झाली. बाजाराला आलेल्यांची धावपळ उडाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT