Kolhapur Bandh esakal
कोल्हापूर

Kolhapur Bandh : कोल्हापुरात कडकडीत बंद; जमाव पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीमार, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

हिंदुत्ववादी संघटनांनी (Hindu Association) पुकारलेल्या कोल्हापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सकाळ डिजिटल टीम

आज सकाळपासूनच शहरातील सर्व बाजारपेठांमधील दुकानं बंद आहेत. सकाळी दहापासून हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकात गर्दी केली.

Kolhapur Bandh : हिंदुत्ववादी संघटनांनी (Hindu Association) पुकारलेल्या कोल्हापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शहरातील दैनंदिन व्यवहार ठप्प आहेत. हिंदुत्ववादी संघटनांचे हजारो कार्यकर्ते छत्रपती शिवाजी चौकात जमून संशयितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

काही कार्यकर्त्यांनी बिंदू चौक आणि गंजी गल्ली परिसरात परिसरात दगडफेक केल्यामुळं पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला. सोशल मीडियातील आक्षेपार्ह स्टेटस् आणि मेसेज प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी आज, बुधवारी (ता. ७) कोल्हापूर शहर बंदची हाक दिली आहे.

आज सकाळपासूनच शहरातील सर्व बाजारपेठांमधील दुकानं बंद आहेत. सकाळी दहापासून हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकात गर्दी केली. आक्षेपार्ह स्टेटस् ठेवून राष्ट्रपुरुषांच्या बदनामीचे मेसेज व्हायरल करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान, गंजी गल्ली आणि बिंदू चौकात काही घरांवर दगडफेड झाल्यामुळं पोलिसांनी जमावावर लाठीमार केला. जमाव नियंत्रित करताना पोलिसांची दमछाक झाली. शहरातील केएमटी बससेवा, प्रवासी रिक्षा वाहतूकही बंद आहे. शहरात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. परिस्थिती तणावपूर्ण बनत असल्याने पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांना चर्चेसाठी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात बोलवलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT