Kolhapur Bandh Jalna Maratha Andolan esakal
कोल्हापूर

Kolhapur Bandh : मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ कोल्हापूर आज बंद; सर्व शाळांना सुटी जाहीर

मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाने आज कोल्हापूर बंदची हाक दिलीये.

सकाळ डिजिटल टीम

सकल मराठा समाजाने कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थी वाहतुकीची व्यवस्था बंद राहण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर : अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीमाराच्या (Jalna Maratha Andolan) निषेधार्थ सकल मराठा समाजाने आज (ता. ५) कोल्हापूर बंदची (Kolhapur Bandh) हाक दिली आहे.

लाठीमाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी, लाठीचार्ज व गोळीबार करणाऱ्या पोलिस अधीक्षक व उपपोलिस अधीक्षक यांना बडतर्फ करावे, अशी मागणी समाजाने केली.

दरम्यान, जनरल डायर कोण रे; पायताण मारा दोन रे, मराठ्यांच्या जीवावर उठणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, बेजबाबदार मुख्यमंत्र्यांचं करायचं काय, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सकल मराठा समाजातर्फे दसरा चौकात जवाब दो आंदोलन झाले.

अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी मराठा बांधव सकाळी अकरा वाजता चौकात जमले. हातात भगवे झेंडे घेऊन ठिकठिकाणांहून बांधव आले होते. चौकात येताच त्यांनी सरकारविरुद्ध संताप व्यक्त केला. मराठा महिला भगिनींच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर घोषणांना जोर चढला.

‘चले जाव, चले जाव फडणवीस चले जाव, जवाब दो जवाब दो महाराष्ट्र सरकार जवाब दो, शाहूनगरीचा एकच निर्धार बेजबाबदार सरकारला खाली खेचणार, मराठा आंदोलकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या नादान सरकारचा धिक्कार असो, बेजबाबदार मुख्यमंत्र्यांचं करायचं काय; खाली डोकं वर पाय, गृहमंत्र्यांचं करायचं काय; खाली डोकं वर पाय, मराठा समाजाला आरक्षण न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, मराठा भगिनींवर हल्ला करणाऱ्या भेकडी वृत्ती सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणांनी चौक दणाणून गेला.

आंदोलनानंतर अचानक पावसास सुरुवात झाली. तरीही आंदोलक चौकात थांबून होते. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराविरुद्ध त्यांच्या तीव्र भावना होत्या. सरकार मराठा समाजाला न्याय कधी देणार की सत्तेसाठी केवळ वापर करून घेणार, अशी विचारणा त्यांच्यातून होत होती.

मराठा आरक्षणासाठी वज्रमूठ

आंदोलनाच्या निमित्ताने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, ठाकरे गट शिवसेना, स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांनी मराठा आरक्षणासाठी वज्रमूठ बांधली. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आंदोलनाची धग कायम ठेवण्याचा निर्धारही या सर्वांनी केला.

हाती झेंडा अन्...

शिवाजी पेठेतील शाहीर मिलिंद सावंत एका हातात भगवा झेंडा, तर दुसऱ्या हातात कोल्हापुरी पायताण घेऊन सहभागी झाले होते. सरकारविरूद्ध त्यांनी रोष व्यक्त करत समाजातील शासकीय, निमशासकीय, निवृत्तीवेतनधारक, आर्थिकदृष्ट्या सधन असणाऱ्यांनी उद्या (ता. ५) दसरा चौकातून निघणाऱ्या फेरीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

रुग्णवाहिकेस दिला मार्ग

आंदोलनात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चौकात कडेकोट पोलिस बंदोबस्त होता. चौकाच्या दिशेने व्हिनस कॉर्नरकडून येणारी वाहने काही वेळ कोंडाओळच्या दिशेने वळवण्यात आली. या दरम्यान सीपीआरच्या दिशेने चौकातून जाणाऱ्या रुग्णवाहिकेस मराठा बांधवांनी तत्काळ मार्ग मोकळा करून दिला.

शहरातील प्राथमिक शाळांना आज सुटी

सकल मराठा समाजाने कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थी वाहतुकीची व्यवस्था बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी हिताचा विचार करून कोल्हापूर महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व प्राथमिक शाळांना आज (ता.५) सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्याबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी परिपत्रक काढून शाळांना सूचना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohammad Shami ने पहिल्याच रणजी सामन्यात घेतल्या ७ विकेट्स अन् मग अजित आगरकरला दिलं उत्तर; म्हणाला, 'त्यांना काय म्हणायचं ते...'

Banke Bihari Temple Treasure Open: तब्बल पाच दशकांपेक्षाही अधिक काळानंतर उघडला ''भगवान बांके बिहारी''चा रहस्यमयी खजाना!

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये कोणाच्याही प्रवासावर कोणतेही बंधन नाही - राम कदम

रांगोळी पहिल्यांदा कधी बनवली गेली? वैदिक-पौराणिक संबंध काय? जाणून घ्या कधीही न ऐकलेला इतिहास

Jalgaon News : सुरक्षितता हीच खरी दिवाळी! बाहेरगावी जाताय, सोने-रोख रक्कम लॉकरमध्ये ठेवा; पोलिसांनी सांगितल्या सुरक्षेच्या महत्त्वाच्या टिप्स

SCROLL FOR NEXT