kolhapur bhoi galli young girl kidnapped case crime marathi news 
कोल्हापूर

आई, आजीच्या डोळ्यांत, अंगावर चटणी पूड टाकून तरुणीला जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न; सहा जणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  घरातून पळून आलेल्या तरुणीसह तिच्या प्रियकराला आणि त्याच्या कुटुंबीयांना मारहाण करण्याची घटना आज घडली. रविवार पेठेतील भोई गल्लीत हा थरारक प्रकार घडला. तरुणीच्या नातेवाइकांनी मुलाची आई, आजीच्या डोळ्यांत, अंगावर चटणी पूड टाकून तरुणीला जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्रस गल्लीतील नागरिक आणि तरुणाचे मित्र यांनी तरुणीला घेऊन जाण्यापासून रोखले. या घटनेची नोंद लक्ष्मीपुरी पोलिसांत असून, सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,

 पेठवडगावमधील एका तरुणीचे भोई गल्ली येथील एका तरुणावर प्रेम आहे. मात्र, तरुणीचे कुटुंबीय तिच्या मनाविरुद्ध दुसऱ्या तरुणाबरोबर लग्न लावून देण्याचा विचार करीत होते. त्यामुळे ती घरातून पळून प्रियकराच्या घरी आली. गेले महिनाभर दोघे परस्पर सहमतीने एकत्र राहत आहेत. तरुणीच्या आई-वडिलांनी तिला घरी आणण्यासाठी प्रयत्न केले; पण तिने येण्यास नकार दिला. आज दुपारी बाराच्या सुमारास एका मोटारीतून तरुणीचे सहा नातेवाईक भोई गल्लीतील मुलाच्या घरी आले. या वेळी मुलाचे वडील कामावर गेले होते, तर तरुण, तरुणी आणि आजी घरात होते. 

नातेवाइकांनी घरात जाताच तरुणाच्या कुटुंबीयांवर चटणी फेकली, तसेच रॉडने दोघांनाही शिवीगाळ करीत मारहाण केली. नातेवाइकांनी तरुणीला जबरदस्तीने ओढत मोटारीत बसविले. तरुणाला खोलीत कोंडले. तरुणाच्या आईने आरडाओरड केल्यावर गल्लीतील लोक, तरुणाचे मित्रही जमले. त्यांनी मोटारीची किल्ली काढून घेत तरुणीला मोटारीतून बाहेर काढले आणि मोटारीची काच फोडली. नागरिकांनी पोलिसांना फोन केला. तत्काळ लक्ष्मीपुरी पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी जमावाला पांगवून दोन्ही कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात नेले. तेथील परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी भोई गल्लीत बंदोबस्त ठेवला. तरुणीच्या फिर्यादीवरून तिचे आई- वडील, चुलते, मामा यांच्यावर गुन्हा दाखल केला. एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल झाला असून, त्यात तीन पुरुष आणि तीन महिला आहेत. 

पोलिस ठाण्याबाहेर गर्दी 
लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर गल्लीतील नागरिकांनी गर्दी केली होती. अखेर पोलिसांनी त्यांना जाण्याची विनंती केली. त्यानंतर गर्दी कमी झाली. दिवसभर दोन्ही कुटुंबीय पोलिस ठाण्यात बसून होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. इच्छेविरुद्ध घेऊन जाण्याचा प्रयत्न, मारहाण ही कलमे त्यांच्यावर लावली आहेत. 

घरात चटणीचा थर 
तरुणाच्या घरात जागोजागी चटणी टाकली होती. तसेच, घराबाहेर बांगड्यांच्या काचाही पडल्या होत्या. त्यामुळे परिसरात तणाव होता. गल्लीत जागोजागी नागरिक गटागटाने उभे होते. अखेर पोलिसांनी गर्दी पांगवून तेथे बंदोबस्त लावला. 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : पिंपरी-चिंचवड येथे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT