kolhapur citizen less use of fireworks in diwali festival for this year the impact of sakal media request 
कोल्हापूर

प्रदूषणमुक्त दिवाळीला पाठिंबा देत कोल्हापुरकरांचा फटाक्यांना फाटा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : पर्यावरणपूरक दिवाळीचा जागर व कोरोनाच्या धास्तीने फटाके उडविताना शहरवासीयांनी आज हात आखडते घेतले. प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी ‘सकाळ’ने मांडलेल्या भूमिकेला नागरिकांनी पाठबळ दिल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळाले. आरोग्यावर होणारे परिणाम लक्षात घेत फटाके उडविणार नाही, अशा प्रतिक्रियाही व्यक्त झाल्या. 

कोरोनामुळे आर्थिक स्थिती कोलमडली. ती सावरत असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता व्यक्त होत आहे. ती थोपविण्यासाठी वातावरण आरोग्यदायी राखणे आवश्‍यक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ‘सकाळ’ने प्रदूषणमुक्त दिवाळीची हाक दिल्यानंतर त्याला नागरिकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ नागरिक, महिला, महाविद्यालयीन तरुणाई, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रदूषणमुक्त दिवाळीची चळवळ बळकट करण्याचा निर्धार केला. त्याची प्रचिती आज अनुभवता आली. दरवर्षी पहाटेच फटाक्‍यांचा दणका उडतो. ध्वनी व वायू प्रदूषणात भर पडण्यास सुरवात होते. यंदा मात्र तसे चित्र आढळले नाही. बहुतांश कुटुंबीयांनी दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करण्याला प्राधान्य दिले.

"पर्यावरणाचा समतोल ढासळू नये, याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करताना त्याचे भान राखायला हवे. ती जाणीव घट्ट करत आम्ही फटाक्‍यांची खरेदी केली नाही. कोरोनाची गंभीर समस्या समोर ठाकली असताना प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प मोलाचा वाटला." 

- शौर्या अभिजित भोईटे, (इयत्ता आठवी, जुना बुधवार पेठ)

"कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वातावरण निरोगी असणे आवश्‍यक आहे. प्रदूषणाने आधीच गंभीर आजारांची समस्या आहे. परिणामी यंदा आम्ही प्रदूषणमुक्त दिवाळी करण्यावर भर दिला." 

- स्वरूपा अमोल सरनाईक, (इयत्ता आठवी, शिवाजी पेठ)

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : पंचगंगा नदीची पाणी पातळी चोवीस तासांत सहा फूट सहा इंचांनी वाढली

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT